जळगाव jalgaon । प्रतिनिधी
गेल्या दिड वर्षांपासून माई (my mother) सोबत नसतांना तीने उभारलेल्या संस्थेची वाटचाल (Movement of the organization)सुरु ठेवण्यासाठी आमचा संघर्ष (Our struggle) सुरु आहे. त्यावर मात कशी करायची हे माईनेच आम्हाला शिकवल आहे. त्यांना उत्तम नागरिक (good citizen) बनवावे, असे आमचे ध्येय असल्याचे मत पद्मश्री स्व. सिंधुताई सपकाळ (Padma Shri Sindhutai Sapkal) यांच्या कन्या ममता सपकाळ (Daughter Mamta Sapkal) यांनी व्यक्त केला.
मल्टीमीडिया फीचर्स आयोजित भवरलाल अॅन्ड कांताबाई जैन फाउंडेशनतर्फे प्रायोजित आठवणीतील आई या सिंधुताईंच्या स्मृतींवर आधारित प्रकट मुलाखतीचे शहरातील छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात आयोजन करण्यात आले होते .
याप्रसंगी त्या बोलत होत्या. विख्यात मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी ही मुलाखत घेतली. सुधीर गाडगीळ यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देतांना ममता सपकाळ म्हणाल्या की, माईंनी उभारलेल्या पाच संस्थेच्या माध्यमातून आमचे काम सुरु आहे. आमच्याकडे येणारी मुलं कुठल्यातरी समस्येतून, अडचणीतून आलेले असतात. त्यांना त्यातून बाहेर काढून मुख्य प्रवाहात आणण्याचे काम करावे लागते. ते आणल्यानंतर त्यांच्या शिक्षणाचा कल घेऊन त्यांना त्या स्वरुपाचे शिक्षण पुरविण्यासंबंधी प्रयत्न केले जातात. व्यक्तिगत आयुष्य, बालपण, तारुण्य, विवाहाबद्दल विचारले असता उच्च शिक्षणाच्या काळात मलाही प्रेम झालं, पण त्यातून मी पळून जाऊन लग्न केलं नाही. नवर्याने प्रपोज केल्यानंतर आईला विचारावे लागेल असे मी त्यांना सांगितले होते. प्रेम आणि विवाह हा सुमारे 12 वर्षांचा काळ होता त्याविषयी माईने हो सांगितल्यानंतरच मी लग्नास होकार दिला, असे त्या यावेळी म्हणाल्या.
संस्थांचे व्यवहार पारदर्शी
संस्थेचे कामकाज करतांना माईंनी लावून दिलेली पद्धत, प्रक्रिया कायम पुढे ठेवली असून त्याचे तुम्ही साक्षीदार आहात. माईंनी उभारलेल्या संस्था बघून तुम्ही देखील त्याचे भागीदार व्हावे. माई असतांनाही संस्थेचा हिशोब ठेवत होतो. प्रत्येक बाबीची पावती देवून त्याचे ऑडीट करुन ते शासानाकडे द्यावे लागते. माई असताना आम्ही खूप काटेकोर नव्हतो. आता मात्र आम्ही सर्व टीम काटेकोरपणाने वागतो. सर्व व्यवहार पारदर्शी, चोख असावेत यावर आमचा भर अल्याचे ते यावेळी म्हणाल्या. प्रास्ताविक मल्टीमीडियाचे संचालक सुशील नवाल यांनी केले.
माईंचा विश्वास टिकवून ठेवायचाय
माई गेल्यानंतर सुरुवातीला सहानुभूती लाट असल्यान संस्थेला बर्यापैकी मदत आली. मात्र माई गेल्यानंतर अजून तरी मोठ्या अडचणी सुरुच झालेल्या नाहीत. दिवाळीत प्रचंड गर्दी असायची मात्र गेल्या दिवाळीला मात्र माई नसल्याची तीव्रता अधिक जाणवली. आजही अनेक संस्था पुढे येऊन मदत करतात. माईंनी निर्माण केलेला विश्वास आम्हाला टिकवून ठेवायचा आहे, असे त्या म्हणाल्या.
आईला स्मरुनच घेतला जातो निर्णय
जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथे बालपणातील सात- आठ वर्षे आपण होता. तिथल्या आठवणी अजूनही ताज्या आहेत, असे ममता सपकाळ यांनी सांगितले. माई गेल्यानंतरची स्थिती, मानसिकता कशी? या प्रश्नावर बोलताना क्षणोक्षणी वाटचालीत माईची आठवण येते. निर्णय घेताना माईला स्मरते आणि तिने हेच केले असते, असे मन सांगते तेव्हा मी तो निर्णय घेत असल्याचे ममता सपकाळ यांनी सांगिले.