आई जगदंबेचा  उदो...उदो...

आई जगदंबेचा उदो...उदो...

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

कोरोनामुळे दोन वर्षांपासून खंडित असलेल्या मरीमाता यात्रोत्सवाला (Mari Mata Yatrotsav) मंगळवारी जल्लोषात प्रारंभ (Start with a bang) झाला. शहरातील मरिमातेच्या मंदिराला (Temple of Mari Mata) सुमारे 157 वर्षांची परंपरा असून आज भाविकांच्या चैत्यनयमय आणि भक्तीमय वातावरणात जल्लोषात टॉवर चौक येथून बारागाडया ओढण्यास (pull baragadas) सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी भाविकांसह नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.

मरीमाता यात्रोत्सवाला सुमारे 157 वर्षाची परंपरा असून भाविक दरवर्षी मनोभावे या बारागाड्या ओढून मरिमातेचा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरा करण्याची परंपरा जोपासत होते. यावेळी भगत संजूनाना मोरे यांची मरिमातेच्या ध्वजासह मिरवणूक काढण्यात आली.

भगत मोरे यांनी प्रथम फुले मार्केटमधील मरिमातेच्या मंदिरात दर्शन घेतले. त्यानंतर बारागाड्यांची विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर टॉवर चौक मार्गे फुले मार्केट, महात्मा गांधी मार्केट, घाणेकर चौक मार्गे बारागाड्या थेट भीलपूरा परिसरात पोहचल्या त्यानंतर भगत संजू मोरे यांच्याहस्ते पूजा होवून बारागाड्यांची सांगता करण्यात आली.

या बारागाड्या यात्रोत्सवादरम्यान, भाविकांमध्ये भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. भीलपूरा परिसराला आज यात्रेचे स्वरुप आले होते. ठिकठिकाणी बारागाड्यांची पूजा भाविकांकडून करण्यात येत होती. पंचक्रोषीतील भाविक यावेळी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

भीलपुरा परिसरात यात्रोत्सवाचा समारोप

यावेळी भगत मोरे यांचे बगले किशोर मोरे, धनराज गायकवाड यांनी सेवा दिली. टॉवर चौक येथून बारागाड्या ओढण्यासं प्रारंभ करण्यात येवून घाणेकर चौक मार्गे भिरपुरा परिसरात बारागाडयांचा समारोप भिलपुरा चौकत करण्यात आले.

या बारागाड्या ओढण्याचे नियोजन पोलीस पाटील प्रभाकर पाटील यांनी नाना सोनवणे, जंगलू मोरे, बापू सोनवणे, अरुण मोरे, ईश्वर मोरे, धनराज गायकवाड, श्रावण कोळी, जगदीश अत्तरदे, युवराज पाटील, रमेश धनगर, रामकृष्ण धनगर, उत्तम चौधरी यांच्यासह भाविकांनी या यात्रोत्सवात सहभागी होत जल्लोष केला.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com