
अमळनेर Amalner :
शहरातील गुरुकृपा कॉलनीतील २८ वर्षीय महिला (women) आपल्या १२ वर्षीय मुलीसोबत (daughter) बेपत्ता (Missing) झाली असून महिलेच्या आईने पोलिसात हरवल्याची नोंद केली आहे. पोलीस महिला व मुलीचा शोध घेत आहेत.
दीपाली नितीन पाटील वय २८ व डिंपल नितीन पाटील वय १२ रा मेहुणबारे ता चाळीसगाव हल्ली मुक्काम गुरुकृपा कॉलनी या दोघी ५ रोजी कामाला जाते व शाळेत जाते असे सांगून घरातून बेपत्ता झाले. ते परत आले नाही म्हणून महिलेची आई अल्काबाई लक्ष्मण पाटील हिने फिर्याद दिल्यावरून अमळनेर पोलीस स्टेशनला हरवल्याची नोंद करण्यात आली आहे. हेडकॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील तपास करीत आहेत. महिला व मुलगी आढळून आल्यास अमळनेर पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.