जिल्ह्यातील बहुतांश गावे पोषण आहारापासून वंचित

जि. प. सदस्या प्रा. डॉ. नीलम पाटील यांचा खळबळजनक आरोप
जळगाव जि.प
जळगाव जि.पJalgaon ZP

जळगाव jalgaon। प्रतिनिधी

कोरोना काळात जिल्ह्यातील शाळा बंद असल्यातरी अंगणवाडीतील सेविकांमार्फत शुन्य ते सहा वर्ष वयोगटातील बालकांना पोषण आहार Infant nutrition देण्यात येत असल्याचा अहवाल जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाला Women and Child Development Department of Zilla Parishadकागदोपत्री सादर करण्यात आला. मात्र प्रत्यक्षात पोषण आहार बालकांपर्यंत पोहचला नसल्याने कुपोषणाची टक्केवारी जिल्ह्यात वाढली आहे. या संदर्भात आरोग्य समितीच्या सभेत जि.प.सदस्या प्रा.डॉ. निलम पाटील Prof.Dr. Nilam Patil यांनी आरोप करीत पोषण आहारावर नियंत्रणासाठी ग्राम समिती स्थापन होण्यासंदर्भात मागणी लावून धरली.

नियंत्रणासाठी ग्राम समिती आवश्यक

जिल्ह्यातील अंगणवाड्यांमार्फत दिला जाणारा पोषण आहारावर नियंत्रणासाठी प्रत्येक गावात नियंत्रण समिती स्थापन करुन गरजू लाभार्थ्यांपर्यंत महिला व बाल कल्याण विभागाची पोषण आहार योजना पोहचते की, नाही याची उलट तपासणी होणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रत्येक तालुक्यात जिल्हा परिषद महिला व बालविकास अधिकार्‍यांनी अंगणवाड्यांची झाडाझडती घेणे आवश्यक आहे.

कोरोना काळातील घोळ

कोरोना काळात जिल्ह्यात ग्रामीण भागातील बहुतांश ठिकाणी अंगणवाड्यांमार्फत दिला जाणारा पोषण आहार लाभार्थ्यांपर्यंत पोहचला नसल्याची बाब समोर आली आहे. यातून कुपोषणासारख्या दोन घटना घडल्याने जिल्हा प्रशासन खळबळून जागे झाले आहे. कोरोना काळात लाभार्थ्यांपर्यंत पोषण आहार पोहचणे गरजेचे असतांना तो का पोहचला नाही? किंवा कुठे गायब झाला. याबाबीही रडारवर येणार असल्याने जिल्हा परिषदेत अधिकारी, कर्मचार्‍यांमध्ये चलबिचल सुरु झाली आहे.

कुपोषण नियंत्रणासाठी प्रयत्नशील

जिल्ह्यात कुपोषणामुळे एक महिला व बालकाचा मृत्यू झाला असून, त्या संदर्भात चौकशी सुरु आहे. संबंधीत विभागाकडून माहिती घेणे सुरु असून जिल्ह्यात कुपोषण नियंत्रणासाठी महिला व बालकल्याण विभाग प्रयत्नशिल राहणार असल्याची ग्वाही नवनियुक्त महिला व बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी डी.के.राऊत यांनी ‘देशदूत’शी बोलतांना दिली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com