
भुसावळ Bhusaval (प्रतिनिधी) -
मध्य रेल्वेने (Central Railway) मालवाहतूक लोडिंगमध्ये (Freight loading) आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी (Best performance) सुरू ठेवत जून २०२२ मध्ये ७.१९ दशलक्ष टन मालवाहतूक (Freight) नोंदवली आहे. ती मागील वर्षांणधील जूनमधील आतापर्यंतची सर्वोत्तम लोडिंग आहे. जून २०२१ मध्ये नोंदणीकृत ५.९७ दशलक्ष टन मालवाहतुकीच्या तुलनेत या महिन्यातील मालवाहतुकीत (Freight) २०.४४ टक्के इतकी वाढ दिसून आली आहे जी कोणत्याही वर्षी जूनमधील आतापर्यंतची सर्वोत्तम होती.
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत म्हणजेच एप्रिल ते जून २०२२ या कालावधीत मध्य रेल्वेने २१.६२ दशलक्ष टन मालवाहतूक नोंदवली आहे. तर एप्रिल ते जून २०२१ या कालावधीत १८.५४ दशलक्ष टन मालवाहतुकीची नोंद झाली असून त्यात १६.६१ टक्के वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत मालवाहतुकीचे लोडिंग हे कोणत्याही आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत आतापर्यंतचे सर्वोत्तम मालवाहतूक लोडिंग आहे.
नागपूर विभागाने जून २०२२ मध्ये ९०१ कोळशाचे रेक लोड केले होते. तर जून २०२१ मध्ये लोड केलेल्या ७५४ रेकमध्ये १९.५०% वाढ झाली आहे. नागपूर विभागाने जून २०२२ या महिन्यात बल्लारशाह येथून लोहखनिजाचे ६४ रेक लोड केले आहेत. मध्य रेल्वेने जून २०२२ मध्ये ऑटोमोबाईल्सचे ६८ रॅक लोड केले होते. जे जून २०२१ मध्ये ३३ रॅक होते ज्यात १०६ टक्के इतकी वाढ झाली आहे. जून २०२२ मध्ये २५ रॅक अन्नधान्य लोड केले होते जे जून २०२१ मध्ये १२ रॅक होते त्या लोडिंगमध्ये १०८ टक्क्यांची वाढ झाली आहे. तसेच जून २०२१ मध्ये ७४ रॅकच्या तुलनेत जून २०२२ मध्ये साखरेचे १०१ रॅक लोड केले गेले. मध्य रेल्वेने जून २०२२ मध्ये जिप्समचे ३ आणि फ्लाय ऍॅशचे ५ रेक यांसारख्या नवीन वस्तू देखील लोड केल्या. मध्य रेल्वेने घेतलेल्या पुढाकारामुळे जून २०२२ मध्ये मुंबई विभागातील धरमतर पोर्ट साइडिंगवरून आयातित कोळशाचे ३० रेक लोड करण्यात आले असल्याची माहिती रेल्वे सुत्रांडून देण्यात आली.
मालवाहतुकीत वाढ होण्याचे श्रेय मध्य रेल्वेने घेतलेल्या विविध उपक्रमांमुळे आहे. ज्यात विभागांवर आणि मुख्यालयात सखोल विपणन, अंमलबजावणीसाठी बिझनेस डेव्हलपमेंट युनिट्स (बीडीयू) स्थापन करणे. मोटारगाड्या सुरक्षितपणे आणि जलद वाहतुकीसाठी कोचमध्ये बदल करणे यासारख्या नाविन्यपूर्ण कल्पना. राबविण्यात आले आहे.- अनिल
कुमार लाहोटीमहाव्यवस्थापक मध्य रेल्वे.