नंदुरबार ज्वेलर्स फोडल्याप्रकरणात मोनुसिंग बावरीला अटक

मुक्ताईनगर येथून एमआयडीसी पोलिसांनी आवळल्या मुसक्या
नंदुरबार ज्वेलर्स फोडल्याप्रकरणात मोनुसिंग बावरीला अटक

जळगाव - jalgaon

शहरातील ढाकेवाडीत नंदुरबारकर ज्वेलर्स (Nandurbar Jewelers) फोडून दागिणे लांबविल्याप्रकरणी शनिवारी एमआयडीसी पोलिसांनी (MIDC Police) अट्टल गुन्हेगार मोनुसिंग जगदीशसिंग बावरील (Criminal Monusingh Jagdish Singh Bawari) रा. तांबापुरा याला मुक्ताईनगर येथून अटक (Arrested) केली आहे. मोनुसिंग याला अटक करण्यासाठी पोलिसांना एक रात्र मुक्ताईनगरात काढावी लागल्याची माहिती समोर आली आहे.

नंदुरबार ज्वेलर्स फोडून २ लाख ४० हजारांचे दागिणे लांबविल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात यापूर्वी स्थानिक गुन्हे शाखेने भारतसिंग आयासिंग भाटीया या संशयितास अटक केली असून तो पोलीस कोठडीत आहे. दरम्यान या गुन्ह्यात मोनुसिंग याचे नाव निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांकडून त्याचा शोध सुरु झाला.

मोनुसिंग हा मुक्ताईनगर गावात असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे मिळाली. त्यानुसार सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, इम्रान सय्यद, गोविंदा पाटील, सुधीर साळवे, सचिन पाटील तसेच मुक्ताईनगर पोलिस स्टेशनचे पोलीस हेडकॉन्स्टेबल अशोक जाधव, माधव गोरेवाल यांनीमुक्ताईनगर येथून मोनूसिंग यास ताब्यात घेतले.

मोनुसिंग याच्यावर यापूर्वी १५ गुन्हेे दाखल असून तो अटल घरफोडी करणारा गुन्हेगार आहे. उद्या त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे त्याच्याकडून जिल्ह्यातील विविध घरफोड्या उघडकीस येणार आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com