
रामविलास शर्मा
नेरी, ता.जामनेर - jamner
सुप्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख (Meteorologist Punjabrao Dak) यांनी नेरी (ता.जामनेर) येथील क्रांती ॲग्रोला आज दि.१२ मे रोजी भेट दिली. यावेळी डख यांनी हवामानाचा एक अंदाज दिला की, दि.22 मे ला मान्सून (Monsoon) अंदमानात तर 2 जून पहिला पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे सांगत 18 जूनला पेरणी योग्य पाऊस पडेल.
सुप्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख (Meteorologist Punjabrao Dak) यांनी नेरी (ता.जामनेर) येथील क्रांती ॲग्रोला भेट दिली. यावेळी डख यांनी हवामानाचा एक अंदाज दिला की, दि.22 मे ला मान्सून (Monsoon) अंदमानात तर 2 जून पहिला पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे सांगत 18 जूनला पेरणी योग्य पाऊस पडेल.
तसेच ठिंबकवर कपाशी लागवड (Cotton cultivation) करण्यायोग्य 29 मे ते 10 जून दरम्यानचा कालावधी सांगितला आणि ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात चांगला पडण्याची शक्यता वर्तवली.
यावेळी पायोनिअर कंपनीचे प्रमोद जाधव, प्रगतशील शेतकरी पप्पू दादा पाटील, सुरेश खोडपे सर, अनिल खोडपे, पिंटू गायकवाड, सुभाष खोडपे, किशोर खोडपे, लीलाधर राणे, विवेक कुमावत, राजेश वाघ, राजेश कुमावत, शुभम खोडपे, डॉ.ऋषीकेश खोडपे, अक्षय खोडपे आदी शेतकरी बंधू उपस्थित होते.