विज बिल थकल्यामुळे मोंढाला ग्रा.प.चा विज पुरवठा खंडित

'नागरिकांची पाण्यासाठी भटकंती, गुरांना पाण्याचा वनवास, गाव अंधारात'
विज बिल थकल्यामुळे मोंढाला ग्रा.प.चा विज 
पुरवठा खंडित

खंडाळा Khandala ता (भुसावळ) वार्ताहर:-

तालुक्यातील मोंढाला गावाच्या ग्रामपंचायतीचे (Mondhala gram panchayat) विज बिल थकल्यामुळे (electricity bill fatigue) महावितरण कंपनी (MSEDCL) ने ग्रामपंचायतीचा वीज पुरवठा तात्पुरता खंडित (Power outage) केला आहे. यामुळे गावातील नागरिकांचे पाण्यासाठी (water) मोठे हाल होत असून विजेअभवी त्यांना पाण्यापासून वंचित (Deprived of water) राहावे लागत आहे. वीज पुरवठा खंडीत केल्याने गाव अंधारातच आहे.

आता कुठं पहिला पेरणी चा पाऊस पडत असून नागरिकांना शेतीच्या कामापासून फुरसत नसून आता त्यांना पाण्यासाठी दिवसभर घरीच राहावे लागत आहे. ग्रामपंचयातीने विज बिल न भरल्याने पुरवठा खंडीत केला आहे. त्यामुळे पाणी असूनही पाणी पुरवठा करता येत नाही. पाणी नसल्याने गावात पाण्याची टंचाई (Water scarcity) निर्माण झाली आहे. गुरांनाही पाणी मिळत नाही.

महावितरण विज कंपनी च्या आडमुठ्या व हेकेखोरी मुळे गावाला त्रास भोगावा लागत आहे. फ़क्त मोंढाला गावावरच महावितरण कंपनी ची वीज बिलाची थकबाकी (Electricity bill arrears) आहे का.? तालुक्यातील व जिल्ह्यात इतर कोणत्याही गावात थकबाकी नाही का.? असा प्रश्न गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे. तरी गावातील ग्रामपंचायतीचे बंद केलेले विज कनेक्शन लवकर जोडून द्यावे अशी मागणी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व गावकरी करीत आहे

थकबाकी अभावी तात्पुरता विज खंडित

शिंदी कक्ष कार्यालयातील मोंढाळे गावातील पाणीपुरवठा वीजबिल थकबाकी रुपये ५४८६३०/- आहे व दिवाबत्ती वीजबिल थकबाकी रुपये ७३७८९०/- आहे. सदर वीज जोडणी वेळोवेळी वीज बिल न भरल्या कारणास्तव मार्च-२०२२ मधे तात्पुरत्या स्वरूपात खंडित करण्यात आलेली होती. व सदरील वीजजोडणी वरील वायर कार्यालयात जमा करण्यात आलेली आहे. अशी शिंदी कक्ष कार्यालयातुन माहिती मिळाली

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com