सोने खरेदीचा साधला मुहूर्त

गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा सोन्याच्या विक्रीत दीडपट वाढ
सोने खरेदीचा साधला मुहूर्त

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

धनत्रयोदशीला (Dhantrayodashi) सोने खरेदी (Buy gold) करणे अत्यंत शुभ मानले जाते. त्यामुळ आज सकाळपासून शहरातील सराफी पेढ्यांमध्ये (Sarafi firms) नागरिकांची सोने खरेदीसाठी गर्दी (Crowd) केली जात आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सोन्या दरात काही अंशी वाढ झालेली असतांना देखील नागरिकांचा कल सोने खरेदीकडेच असल्याने गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा सोन्याची विक्रीत दीडपट वाढ झाली असल्याची माहिती शहरातील सोने विक्रेत्यांनी दिली.

कार्तिक महिन्याच्या कृष्णपक्षाच्या त्रयोदशीच्या तिथीला धनत्रयोदशी साजरी केली जाते. यंदा 2 नोव्हेंबर रोजी म्हणजेच मंगळवारी साजरी केली जाणार आहे. धनत्रयोदशीचा दिवस हा धन्वंतरी त्रयोदशी म्हणूनही ओळखला जातो. या दिवशी कोणतीही वस्तू, सामान किंवा संपत्ती खरेदी केल्यास त्याला धनाच्या देवतेचा आशीर्वाद लाभतो. या दिवशी आयुर्वेदाची देवता धन्वंतरीचीही पूजा केली जाते. देवी लक्ष्मीची आणि गणपतीची मूर्ती खरेदी करून दिवाळीच्या दिवशी त्यांची पूजन केले जाते. या दिवशी अनेक जण सोनेखरेदीचा मुहूर्त सधत असल्याने शहरातील सराफी पेढ्यांमध्ये गेल्या आठवड्याभरापासून ग्राहकांच्या पसंतीस उतरण्यासाठी विविध प्रकारचे आकर्षक डिझाईन असलेले दागिने विक्रीसाठी दाखल झाले आहे. त्यामुळे आज धनत्रयोदशीच्या मुहूर्त साधत ग्राहकांनी सकसाळपासून सराफी पेढ्यांसह शो-रुममध्ये गर्दी केल्याचे चित्र दिसून आले.

यंदा सोन्याची बाजारपेठ तेजीत

गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा धनत्रयोदशीच्या दिवशी सोने व चांदीच्या दरात काहीशी वाढ झाली आहे. मात्र तरी देखील नागरिकांकडून या दिवशी सोने खरेदीचा मुहूर्त टाळण्यात आला नाही. दरम्यान, यंदा कोरोनाची परिस्थिती निवाळल्यानंतर बाजारपेठ पुवर्वत होत असल्याने नागरिकांकडून यंदाच्या दिवाळीत सोने खरेदीचा मुहूर्त साधला जात असल्याने सोने बाजारपेठ तेजीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. गेल्यावर्षी कोरोनाचे सावट असल्याने नागरिकांडून दिवाळी अत्यंत साधेपणाने साजरी केली जात होती. परंतु यंदा कोरोनाचे सावट नाहिसे झाल्याने नागरिकांकडून नवनवीन वस्तुंसह गुंतवणुक म्हणून सोने व चांदीचे दागिने खरेदी केली जात आहे. त्यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा सोने व चांदीच्या विक्रीत दीड पट वाढ झाली असल्याचे शहरातील सोने विक्रेत्यांनी सांगितले.

नागरिकांकडून धनतेरसच्या शुभ मुहूर्तावर सोने खरेदीचा मुहूर्त साधला जात आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा दिडपट सोने विक्री वाढली असल्याने ग्राहकांचा सोने खरेदीकडे कल अधिक असून आकर्षक डिझाईन असलेल्या दागिन्यांना अधिक पसंती दिली जात आहे.

भागवत भंगाळे, संचालक भंगाळे गोल्ड

गेल्यावर्षी कोरोनामुळे अनेकांवर आर्थीक संकट ओढावले होते. त्यामुळे प्रत्येकाने दिवाळी अत्यंत साधेपणाने साजरी केली होती. परंतु यंदा सर्वच अनलॉक असल्याने अनेकांनी सोने खरेदीसाठी धनत्रयोदशीचा मुहुर्त साधला. त्यामुळे यंदा दिवाळीत नागरिकांकडून मुक्तपणे खरेदी केली जात आहे.

मनोहर पाटील, जनसंपर्क अधिकारी, आर. सी. बाफना ज्वेलर्स

असा आहे सोन्याचा भाव

मंगळवारी धनत्रयोदशी असल्याने आज सोने बाजारापेठेत 24 कॅरेट सोन्याचा भाव हा 48 हजार 500, 22 कॅरेट सोन्याचा भाव 44,430 भाव प्रति 10 ग्रॅम साठी तर चांदीचा भाव हा प्रति किलोसाठी 65, 500 रुपये आहे. गेल्या वर्षी गेल्यावर्षी लॉकडाऊनमुळे अनेकां धनत्रयोदशीचा मुहूर्त हुकल्याने प्रत्येकाने दिवाळी अत्यंत साधेपणाने साजरी केली होती. मात्र यंदा संपुर्ण बाजारपेठ खुली झाली त्यातच शासकीयसह खासगी कंपन्यांकडून देखील कर्मचार्‍यांना बोनस दिला असल्याने यंदा अनेकांनी आजच्या धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर सोने खरेदी करीत दिपोत्सवातील चैतन्य निर्माण केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com