रावेर येथील ३८ वर्षीय महिलेचा विनयभंग ; आरोपी अटकेत

Crime
Crime


रावेर|Raver प्रतिनिधी-

शहरातील स्टेशन रोडवरील शिव कॉलनी (Shiv Colony)तील ३८ वर्षीय महिलेचा विनयभंग करणाऱ्या शेजारी राहणाऱ्या युवकाविरुद्ध महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून रावेर पोलिसात गुन्हा (crime) नोंद करण्यात आला आहे. आरोपीला पोलिसांनी रावेर न्यायालयात हजर केले असता, न्यायालयीन कोठडी (Judicial custody) मिळाली आहे.

येथील शिव कॉलनी (Shiv Colony)मध्ये दि.१५ रोजी बाजार करून घरी आलेल्या ३८ वर्षीय महिलेकडे बघुन इशारा केला. तिच्या घरात जात, हात पकडून शिवीगाळ केली व ओढणी ओढण्याचा प्रयत्न केलेल्या पिंटू उर्फ संदीप मशाने विरुद्ध महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा (crime) दाखल करण्यात आला आहे.

आरोपीला पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. याबाबत पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिपाली पाटील करत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com