साडेसहा लाखांचे मोबाईल लांबविले

गोलाणी मार्केटमधील काही दुकाने फोडण्याचा प्रयत्न; गुन्हा दाखल
साडेसहा लाखांचे मोबाईल लांबविले

जळगाव । Jalgaon । प्रतिनिधी

शहरातील गोलाणी मार्केट (Golani market) समोर असलेल्या वाघ चेंबरमधील मोबाईलच्या दुकानाचे लॉक तोडून दुकानातून साडेसहा लाख रुपये किंमतीचे अ‍ॅपल कंपनीचे (Apple Company) महागडे मोबाईल लांबविल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. चोरट्यांनी चोरी केल्यानंतर दुकानातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचा डीव्हीआर लांबविला असून याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील सिंधी कॉलनीतील गणेश नगरात विनित कैलासकुमार आहुजा हे कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. त्यांचे गोलाणी मार्केटसमोरील वाघ चेंबरमध्ये श्री. एस. एस. डी. मोबाईल नावाने दोन मजली मोबाईलचे दुकान असून हे दुकान त्यांचा लहान भाऊ रोहीत सांभाळतो. तसेच या दुकानात शरीक शेख व नविद शेख दोघ रा. मास्टर कॉलनी तर सयद जोएफ अली रा. उस्मानिया पार्क हे कामाला आहे.

मंगळवारी रात्री 9.30 वाजता नेहमीप्रमाणे आहुजा हे दुकान बंद करुन घरी निघून गेले. बुधवारी सकाळच्या सुमारास पावणेदहा वाजेच्या सुमारास त्यांच्या दुकाना शेजारील दुकानाचे मालक जयेश पोपटानी यांनी आहुजा यांना तुमच्या दुकानाच्या चॅनल गेटचे कुलूप तुटलेले असून तुम्ही लवकर दुकानात या अशी असे सांगितले. त्यानुसार आहुजा लहान भावाला घेवून त्यांनी दुकान गाठले.

रोख रकमेसह लांबविले अ‍ॅपलचे महागडे मोबाईल

विनित आहुजा यांनी दुकानावर येवून बघितले असता, त्याना दुकानाच्या वरच्या बाजुलच्या चोरट्यांनी लॉक पट्टी तोडून दुकानात प्रवेश केला. तसेच दुकानात विक्रीसाठी ठेवलेले 6 लाख 26 हजार रुपये किंमतीचे अ‍ॅपल कंपनीचे महागडे फोनसह रोख रक्कम चोरट्यांनी लांबविल्याचे त्यांना दिसून आले.

इतर दोन दुकानात चोरीचा प्रयत्न

चोरट्यांनी मोबाईलच्या दुकानात डल्ला मारल्यानंतर त्यांनी आपला मोर्चा इतर दुकानांकडे वळविला. दरम्यान, त्यांनी याच मार्केटमधील इतर दोन दुकानांमध्ये चोरीचा प्रयत्न केला. मात्र दुकानात त्यांना काहीच मिळून आले नसल्याने रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी कोणीही तक्रार द्याययला आले नव्हते.

ठसे तज्ज्ञांनी घेतले पुरावे

भररस्त्यावरील दुकानात चोरी झाल्याचे समजताच श्वान पथकासह ठसे तज्ज्ञांच्या पथकाला पाचारण करण्यात आले होते. पथकाने घटनास्थळाहून चोरट्यांचे ठसे ताब्यात घेतले. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी हे करीत आहे.

डीव्हीआर देखील नेला सोबत

चोरट्यांनी दुकान फोडून दुकानात चोरी केल्यानंतर त्यांनी दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचा डीव्हीआर बॉक्स देखील लांबवून नेला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com