मनसेच्या पदाधिकार्‍याने महिला कर्मचार्‍याला मागितली खंडणी

मनसेच्या पदाधिकार्‍याने महिला कर्मचार्‍याला मागितली खंडणी

जळगाव jalgaon। प्रतिनिधी

पंचायत समितीमध्ये (Panchayat Samiti) कंत्राटी तत्वावर काम करणार्‍या महिलेला (woman) पैसे (Paying) देत असल्याचा व्हिडीओ (Video) तयार करीत, एसीबीचे अधिकारी (ACB officers) असल्याची बतावणी करीत कारवाई करण्याची धमकी (Threat of action) देत कर्मचारी महिलेकडून मनसेच्या पदाधिकार्‍यानेे (office bearers of MNS) खंडणी मागितल्याचा (Ransom demanded) प्रकार उघडकीस आला आहे. तसेच महिलेने पैसे देण्यास टाळाटाळ केल्याने महिलेचा विनयभंग (Rape of a woman) देखील केला. याप्रकरणी मनसे पदाधिकारी राजेंद्र निकम रा. वाघनगर, महेंद्र सोनवणे रा. खर्दे ता. धरगणाव याच्यासह तीन जणांविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात खंडणी व विनयभंगाचा (Crime of extortion and molestation) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील पंचायत समीतीच्या कार्यालयात महिला कंत्राटी पद्धतीवर डाटा एंट्री ऑपरेटर म्हणून नोकरी करतात. दि. 7 रोजी चार ते पाच इसम महिलेजवळ गेले, त्यातील महेंद्र सोनवणे रा. खर्दे ता. धरणगाव व राजेंद्र निकम रा. वाघ नगर यांनी त्यांची ओळख क्राईम इन्व्हेस्टीगेशन न्युज रिपोर्टर अशी दिली. यावेळी महेंद्र सोनवणे यांनी मी तुमच्या पतीचा लांबचा नातेवाईक असून मी तुमच्याकडे काम घेवून येईल तेवढी तुम्ही मदत करा असे म्हणत त्याने महिलेच्या टेबलावर हजार रुपये ठेवून तो निघून गेला. थोड्यावेळाने पुन्हा तीन इसम महिलेजवळ आले आणि तुमच्याकडे महत्वाचे काम असल्याचे सांगत त्यांना गेटजवळ घेवून गेले.

मार्केट परिसरात बोलावून केला विनयभंग

शनिवारी सकाळच्या सुमारास अनोळखी इसम महिलेच्या घरी जावून तुम्हाला राजेंद्र निकम यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्केट येथे भेटण्यासाठी बोलविले असल्याचे सांगितले. त्यानुसार महिला त्याठिकाणी गेल्या असता, निकम याने महिलेशी अश्लिल वर्तन करुन त्यांचा विनयभंग केला.

पोलिसांसमोर कथन केली आपबिती

भेदारलेल्या अवस्थेत असलेल्या महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. परंतु नातेवाईकांनी त्यांना विश्वासात घेतल्याने त्यांनी घडलेली आपबिती त्यांच्यासमोर कथन केली. महिलेच्या नातेवाईकांनी तात्काळ जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेत पोलिसांना घटनेची माहिती देत त्यांना समज देण्यासाठी पोलीस ठाण्यात बोलाविले. परंतु ते दोघही पोलिस ठाण्यात न आल्याने अखेर महिलेने पोलिसात तक्रार दिली.

त्यावरुन क्राईम इन्व्हेस्टीगेशन न्यूज रिपोर्टर महेंद्र सोनवणे रा. खर्दे ता. धरणगाव, राजेंद्र निकम रा. वाघ नगर यांच्यासह तीन अनोळखी इसम यांच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलिसात खंडणीसह विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप चांदेलकर हे करीत आहे.

एसीबीचे अधिकारी असल्याचे सांगत उकळली खंडणी

गेटजवळ गेल्यानंतर त्याठिकाणी महेंद्र सोनवणे, राजेंद्र निकम व अन्य दोन जण उभे होते. त्यातील राजेंद्र निकम म्हणाला की, पैसे घेतांना आम्ही तुझा व्हिडीओ बनविलेला आहे. आम्ही एसीबीचे अधिकारी असून आमची टीम बाहेर उभी आहे. आम्हाला पैसे दे नाही तर तुझ्यावर गुन्हा दाखल करुन व्हिडीओ व्हायरल करतो अशी धमकी त्यांनी महिलेला दिली.

व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत पैशांसाठी तगादा

थोड्यावेळानंतर राजेंद्र निकम याने महिलेला फोन करुन पैशांची व्यवस्था झाली का? आमचे अधिकारी गुन्हा दाखल करा असे सांगत असल्याचे त्या महिलेला सांगितले. त्यानुसार महिलेने ओळखींच्यांकडून पैसे घेवून त्यांनी विद्युत कॉलनी परिसरातील आशय हॉस्पिटलजवळ उभ्या असलेल्या महेंद्र सोनवणे व राजेंद्र निकम यांना दिले. तसेच व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देवून वारंवार त्या दोघांनी महिलेकडे पैशांसाठी तगादा लावला होता.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com