आ.सुरेश भोळे म्हणतात.... महापौरांनी राजकारणापेक्षा शहराच्या विकासाकडे लक्ष द्यावे

 आ.सुरेश भोळे  म्हणतात.... महापौरांनी राजकारणापेक्षा शहराच्या विकासाकडे लक्ष द्यावे

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

महापौरांनी राजकारणापेक्षा (Mayor than politics) शहराच्या विकासाकडे लक्ष (Towards the development of the city) द्यावे, शहरातील रस्त्यांच्या 0problem of roads( समस्येने नागरीक त्रस्त (Citizens suffer) झाले आहेत. निवडणूका येतील तेव्हा राजकारण करावे. लोक उपोषणाला बसत आहेत, त्यांच्या समस्यांकडे लक्ष द्यावे, (Attention to problems) जनतेचे प्रश्न सोडविण्याची गरज आहे. राजकारणापेक्षा पाठपुरावा महत्वाचा असून आरोप (Accusation) करण्यापेक्षा महापौरांनी प्रशासनाकडून काम (Work from the administration)करून घेतले पाहिजे, आरोप-प्रत्यारोपाने प्रश्न सुटत नसल्याचे प्रतिपादन भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ.सुरेश भोळे (BJP district president MLA. Suresh Bhole) यांनी केले. 3 रोजी भाजपा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

आ. सुरेश भोळे म्हणाले की, मागील काळात जिल्हा नियोजन समितीकडून पालकंमत्र्यांनी निधी दिला होता. जळगाव शहराच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे. निवडणूका येतील तेव्हा प्रत्येकाला व्यासपीठ आहे. महापालिका प्रशासन जनतेसाठी काही करत आहे काय? रस्ते दुरूस्तीसाठी पैसे असूनही कामे होत नाहीत. शहरातील रस्त्यांचा प्रश्न मनपा प्रशासन गांभीर्याने घेत नसल्याचा आरोप त्यांनी केला.

भविष्यात रस्ते प्रश्नी जनतेचा उद्रेक होण्याची मनपा प्रशासन वाट पाहत आहे काय? असा सवालही आ.भोळे यांनी उपस्थित केला. रस्त्याप्रश्नी महापालिकेने झोपेंचे सोंग घेऊन नये, अन्यथा भाजपा रस्त्यावर उतरेल, असाही इशाराही त्यांनी यावेळी दिला. नियमित कर भरूनही जनतेला सुविधा मिळत नसतील तर जनतेने कुणाकडे जायचे असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. महापालिकेने विविध सुविधा केंद्रांच्या पैशातून उभारल्या आहेत.

रस्त्यांच्या कामांना प्राधान्य द्या, आम्ही मदतीसाठी तयार आहोत, असेही आ. सुरेश भोळे यावेळी म्हणाले. जळगाव शहराच्या विकासासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ना.गिरीश महाजन यांच्याकडे निधीची मागणी केली आहे. श्वेतपत्रिका काढा, मात्र त्यात हुडकोचे कर्ज कुणी माफ केले. किती निधी केंद्राने दिला याचाही उल्लेख करावा.

तसेच महापालिकेचा सन 2017 चा 25 कोटींचा निधी अद्यापही खर्च झालेला नसल्याचे त्यांनी सांगितले. केंद्र व राज्य शासनाने महापालिकेला दिलेल्या कोट्यावधी रुपयांच्या निधीचा लेखाजोखा त्यांनी पत्रपरिषदेत मांडला.

यावेळी पत्रकार परिषदेला मनपा गटनेते भगत बालाणी, महानगराध्यक्ष दिपक सुर्यवंशी, प्रसिध्दी प्रमुख मनोज भांडारकर आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com