आमदार साहेब, तुम्ही फक्त बस चालवून दाखवा!

कर्मचार्‍यांचा आमदार चंद्रकांत पाटील यांना इशारा
आमदार साहेब, तुम्ही फक्त बस चालवून दाखवा!

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

आमदार चंद्रकांत पाटील (MLA Chandrakant Patil) यांनी बससेवा (Bus service) पुर्ववत करण्यासाठी कर्मचारी (Staff) रुजू झाले नाही तर स्वतः बस चालवून बाहेर काढीन असे विधान केले होते. या विधानावरुन बस कर्मचारी (employees) आक्रमक झाले आहे. जळगाव आगारात (Jalgaon depot) बस कर्मचार्‍यांतर्फ जोरदार घोषणाबाजी, (Sloganeering) निदर्शने करत निषेध व्यक्त करण्यात आला. विलिनीकरणाशिवाय माघार नाही, अशी भूमिकाही कर्मचार्‍यांनी व्यक्त केली.

मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी 22 डिसेंबरचा अल्टीमेटम एस.टी. कर्मचार्‍यांना दिला असून बस कर्मचारी जर कामावर रुजू न झाल्यास स्वतः हातात स्टेअरिंग घेवून बस बाहेर काढेल असा इशारा दिला होता. या विधानाचा जळगाव आगारातील एस.टी .कर्मचार्‍यांनी बसस्थानकात निदर्शने करत निषेध व्यक्त केला आहे.

अपघातानंतर दिली होती प्रतिक्रिया

एस.टी. विभागाला शासनात विलीनीकरण करावे या मागणीसाठी बस कर्मचार्‍यांचे कामबंद आंदोलन सुरु आहे. मागण्यांवर कुठलाही तिढा अद्यापर्यंत शासनाने काढलेला नाही. दुसरीकडे बस कर्मचारी मागण्यांवर ठाम आहे. बस सेवा ठप्प झाल्यामुळे नागरिकांमुळे खाजगी वाहनांचा आधार घेवून असुरक्षित तसेच जीवघेणा प्रवास करण्याची वेळ आली आहे. गारखेडाजवळ अपघातात प्रवासी वाहतुक करणार्‍यांना रिक्षाचा अपघात होवून तीन जणांचा मृत्यू झाला होता. अपघातानंतर आमदार चंद्रकात पाटील यांनी लवकरात बस कर्मचार्‍यांनी कामावर रूजू होवून बससेवा पुर्ववत करावी, अन्यथा माझ्या मतदारसंघात स्वतःच कार्यकर्त्यांना सोबत बस बाहेर काढून सेवा देईन. असा इशारा बोदवड येथे पत्रकारांशी बोलतांना दिला होता.

या विधानाचा बसस्थानकातील कर्मचार्‍यांनी जोरदार घोषणाबाजी तसेच निदर्शने करत निषेध व्यक्त केला आहे. तसेच मुक्ताईनगर ते जळगाव बस चालवून दाखवा, खरच तुम्हाला लोकप्रतिनिधी मानू असा इशाराही कर्मचार्‍यांनी दिला आहे. संपकरी कर्मचारी व आमदार चंद्रकांत पाटील यांचा शाब्दिक युध्द सुरु झाले असून आ. चंद्रकांत पाटील नेमकी काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com