आमदार सदाभाऊ खोत यांनी आरोग्यमंत्र्यांवर लावला मोठा आरोप....

चाळीसगाव येथे पत्रपरिषद : आरोग्य मंत्र्यांच्या उत्तराकडे लागले लक्ष
आमदार सदाभाऊ खोत यांनी आरोग्यमंत्र्यांवर लावला मोठा आरोप....

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

कोवीड (Kovid) काळात सर्वात जास्त हाल कष्टकरी, शेतकरी व श्रमिक वर्गाचे झाले. परंतू राज्य सरकारने (State Government) केंद्राकडून (Central Government) आलेल्याच सुविधा पुरवण्याच्या कामाशिवाय दुसरे काही केले नाही. राज्यातील श्रमिक जनतेला त्यानी वार्‍यावर सोडले. राज्यातील सर्व मोठ-मोठ्या हॉस्पीटलच्या (Hospital) डॉक्टरांशी छुपी युती करुन डॉक्टरांकडून (doctor) आरोग्य मंत्र्यांनी (Minister of Health) हप्ते (Installments) घेतले आहे. तसेच कोवीड काळात महाराष्ट्रातील सर्वात मोठा आर्थिक गैरव्यवहार (Financial malpractice) केल्याची गंभीर आरोप (Serious allegations) माजी मंत्री तथा आमदार सदाभाऊ खोत (MLA Sadabhau Khot) यांनी केला.

‘ जागर शेतकर्‍यांना आक्रोश महाराष्ट्राचा ’ (Maharashtra's outcry against vigilant farmers) या शेतकरी दौर्‍यानिमित्ताने आज रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष, माजी मंत्री तथा आमदार सदाभाऊ खोत, चाळीसगाव येथे आले होते. दौर्‍या माहितीसाठी आ.मंगेश चव्हाण (MLA Mangesh Chavan) यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष प्रा.सुनिल निकम, शहराध्यक्ष घृष्णेश्‍वर पाटील, नगरसेवक नितीन पाटील, आनंद खरात यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, रयत क्रातंी संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

पुढे बोलतांना सदाभाऊ खोत (MLA Sadabhau Khot) म्हणाले की, कोवीड काळात कोरोनावर फक्त मुख्यमंत्र्यांनी प्रबोधन केले. कोरोनाबाबत लोकांच्या मनात प्रचंड भिती निर्माण करुन, त्यांना भितीखाली ठेवले, त्यांच्या रोजीरोटीसाठी कुठल्याही प्रकारची सोय केली नाही. कष्टकरी जनतेला वार्‍यावर सोडून मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार (Financial malpractice) केला आहे. तसेच मुख्यमंत्री हे ठाकरे हे न उगवलेल्या बियाण्यासारखं असल्याची टिका त्यांनी केली. भाजपाच विरोधात ज्या वेळेस राज ठाकरेंनी लोकसभेच्या निवडणुकीवेळी ‘ लाव रे तो ’ व्हिडिओ म्हटले की राष्ट्रवादी व कॉग्रेसवाले टाळ्या वाजवत होते. आता त्यांनी ‘ गाडा रे यांना मातीत ’ म्हटल्याबरोबर ते भाजपाकडे निघाल्याचेे म्हटले जातेय. आता पोटात गोळा सुटायला लागला आहे ? असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला. तसेच राज्यात टीईटी घोटाळ्यासह अनेक मोठे घोटाळे राज्यसरकारने केले असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केले.

पुढे माहिती देतांना ते म्हणाले की, फडणवीस सरकारच्या काळात मराठा आरक्षणासाठी (Maratha reservation)निघणारे लांखोचे मराठा मोर्चा (Maratha front) गेले कुठे ? हे सर्व मोर्च त्या काळात राष्ट्रवादी कॉग्रेस व कॉग्रेसने फडणवीस सरकारविरोधात होते. परंतू तरी देखील फडणवीस यांनी मराठा आरक्षण कोर्टात टिकवले होते. परंतू महाविकास आघाडी सरकाने ते घालवले आहे. तसेच ओबीसी आरक्षण (OBC reservation) सुध्दा महाविकास आघाडी सरकारने घालवले असून आता ओबीसी नेते छगन भुजबळ गप्प का? असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला. शरद पवार हे आतापर्यंत जातीपातीचे राजकारण करत असल्याचा देखील आरोप त्यांनी केला. तसेच ‘ जागर शेतकर्‍यांना आक्रोश महाराष्ट्राचा ’ या अभियानाची सांगता सोलापूर येथे होणार असून त्याठिकाणी राज्यातून २० ते २५ हजार शेतकरी जमणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

महागाईबाबत गोलमोल उत्तरे-

माजी मंत्री तथा आमदार सदाभाऊ खोत यांना पत्रकारांनी केंद्रासरकारच्या महागाईबाबत प्रश्‍न उपस्थित केले असता, शेतकर्‍यांच्या हितासाठी असलेल्या महागाईचे मी समर्थन करतो. तसेच केंद्राची धोरणे योग्य असून इंधनदरवाढीला राज्य सरकार जाबदार असल्याचे सांगत, महागाईसंदर्भातील प्रश्‍नाबाबत गोलमोल उत्तरे देवून त्यांनी वेळ मारुन नेत, पत्रकार परिषद आटोपती घेतली.

Related Stories

No stories found.