आ.मंगेश चव्हाण यांनी रस्त्यासाठी पाच लाखांचा निधी देवून केले कामाचे उद्घाटन

आ.मंगेश चव्हाण यांनी रस्त्यासाठी पाच लाखांचा निधी देवून केले कामाचे उद्घाटन

तडकाफडकी निर्णय घेत शेतकर्‍यांची ४० वर्षांपासूनची समस्या एका तासातच सोडवली

चाळीसगाव Chalisgaon प्रतिनिधी

शहरालगत पावर हाऊस व ओझर शिवारात बहुतांश शेती ही पूर्वापार राहणार्‍या चौधरी समाजाची आहे. या शेतांमध्ये जाण्यासाठी असणारा मुख्य रस्ता हा दगडमातीचा कच्चा असल्याने व त्यावर ठिकठिकाणी मोठं मोठे खड्डे असल्याने सदर रस्ता दुरुस्तीची मागणी सदर शेतकरी बांधव गेल्या ४० वर्षांपासून करत होते. या विषयी शेतकर्‍यांनी आमदारांकडे समस्या मांडली असता, शेतकर्‍यांची प्रामाणिक तळमळ बघत आपल्या निधीतून तात्काळ ५ लाख रुपये देण्याचे जाहीर केले व तेव्हड्यावरच न थांबता ठेकेदार विजय चौधरी यांना बोलवून तात्काळ रस्त्याचे काम करण्याचे सूचना देवून, सायंकाळी रस्त्याच्या कामाचे भूमीपूजन करुन, शेतकरी व लोकांची मने जिंकली.

शहरातील चौधरी वाड येथे शेतीकामांसाठी शेतकर्‍यांना आता शेतात जास्त जावे लागणार आहे. त्यातच मागील २ दिवसात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांचे व गुरा ढोरांचे त्याचप्रमाणे हातमजुरी करणार्‍या मजुरांची मोठी गैरसोय झाली. रस्त्यावरील खड्ड्यात पाणी साचल्याने त्यावर पायी चालणे देखील कठीण झाले होते. हा त्रास सदर शेतकर्‍यांना दर पावसाळ्यात होत असल्याने मोठ्या कष्टाने पिकविलेला शेतमाल वेळेत बाजारात आणणे दुरापास्त होत होते.

ही सर्व अडचण घेऊन या त्रस्त शेतकर्‍यांनी आपल्या प्रमुख प्रतिनिधी सोबत आमदार मंगेश चव्हाण यांची दि.२९ मे रोजी सकाळी भेट घेतली व आपल्या स्थानिक विकास निधीतून डोहर वाड्यापासून ते नाल्यापर्यंतचा रस्ता खडीकरण करून देण्याची विनंती केली. आमदार मंगेश यांनी देखील शेतकर्‍यांची गेल्या अनेक वर्षांपासून असलेली समस्या समजून घेतली व त्यांना विचारले की किती निधी दिला तर हा रस्ता तयार होईल. त्यावर शेतकर्‍यांनी सांगितले की खडीकरण करण्यासाठी आवश्यक असणारा कच्चा माल जवळच उपलब्ध आहे, तसेच हे काम आम्ही कुठल्याही आर्थिक दृष्टिकोन ठेवून न करता स्वतः उभे राहून करणार असल्याने शासनाच्या अंदाजपत्रकापेक्षा जास्त आणि टिकाऊ काम आम्ही करून घेऊ कारण या रस्त्यावरच आमचे शेतीचे अर्थकारण अवलंबून आहे.आमदार मंगेश यांनीदेखील शेतकर्‍यांची प्रामाणिक तळमळ बघत आपल्या निधीतून तात्काळ ५ लाख रुपये देण्याचे जाहीर केले व तेव्हड्यावरच न थांबता काही दिवसातच पावसाळा सुरू होणार आहे. शेतीकामांसाठी शेतकर्‍यांना आता शेतात जास्त जावे लागणार आहे.

त्यामुळे निधीचे पत्र दिल्यानंतर त्या कामाला मान्यता मिळण्यासाठी जवळपास एक ते दीड महिना लागेल, काम होईपर्यंत अर्धा पावसाळा निघून जाईल. म्हणून आमदार मंगेश यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे ठेकेदार विजय चौधरी यांना बोलावून घेत त्यांना सदर कामाची जबाबदारी दिली व सांगितले की तुम्ही आताच दुपारी माझ्या निधीचे ५ लाखांचे पत्र घ्या, तो निधी मंजूर होईल तेव्हा होईल, तुमचा कष्टाचा एक रुपया बुडणार नाही, त्याची जबाबदारी मी घेतो मात्र मला या शेतरस्त्याचे काम आजच संध्याकाळी सुरू झालेल पाहिजे. मी स्वतः संध्याकाळी तेथे नारळ फोडायला येतो. आमदार मंगेश यांनी शेतकर्‍यांच्या हितासाठी तडकाफडकी घेतलेला निर्णय पाहून उपस्थित शेतकरी देखील भारावले. ठेकेदार चौधरी यांनी देखील आनंदाने ही जबाबदारी स्वीकारत त्याचदिवशी संध्याकाळी कामाला सुरुवात केली. आमदार मंगेश चव्हाण यांच्याहस्ते नारळ फोडून या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन देखील संपन्न झाले.

यावेळी नगरसेवक राजेंद्र चौधरी, नगरपालिका गटनेते संजय रतनसिंग पाटील, भाजपा शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, नगरसेवक बापू अहिरे, सामाजिक कार्यकर्ते सदानंद चौधरी, युवा मोर्चा माजी तालुकाध्यक्ष रोहन सूर्यवंशी, अनिल ठाकरे चौधरी, अमोल चौधरी, भाजपा कार्यकर्ते मयूर चौधरी यांच्यासह शेतकरी सचिन चौधरी, उमाकांत चौधरी, दत्तात्रय चौधरी, दिनकर चौधरी, गोपाल चौधरी, सुनील चौधरी, चंद्रकांत चौधरी, पोपट चौधरी, मोहन चौधरी, भूषण चौधरी, चेतन चौधरी, रोहिदास चौधरी, अनिल चौधरी, सुनील चौधरी, नामदेव चौधरी, सोनू चौधरी, सुदाम चौधरी, अशोक चौधरी, लक्ष्मीकांत चौधरी, जिभु चौधरी, धनंजय चौधरी, प्रल्हाद चौधरी आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.