Video : आमदाराचे स्टिंग ऑपरेशन : पोलिस वाहन चालकांकडून पैसे घेतल्याचे केले व्हिडिओ

अधिवेशनात पोलिस, अधिकाऱ्यांच्या निलंबणाची मागणी करणार- मंगेश चव्हाण

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

चाळीसगाव (chalisgaon)तालुक्यातील अवजड वाहनांसाठी बंद असलेल्या कन्नड घाटात (kannad ghat)महाराष्ट्र पोलीस ट्रक चालकांकडून कशा प्रकारे पैसे वसुली करतात याचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. यानंतर चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण (mangesh chavan)यांनी वेषांतर करत स्टिंग ऑपरेशन केले. यामुळे चाळीसगाव ग्रामीण पोलिसांचा वसुलीचा प्रकार उघड झाला.

तालुक्यात ग्रामीण भागात गुरे चोरी व इतर गुन्हांचे प्रमाण वाढलेले आहे. त्या गुन्हांचा तपास करण्यासाठी चाळीसगाव ग्रामीण पोलिसांना वेळ नाही. परंतु कन्नड घाटात वसुली करण्यासाठी आधिकारी व कर्मचारी स्वता; हजर राहतात. त्यामुळे वसुलीत शामिल सर्व आधिकारी व कर्मचार्‍यांची निलंबनाची मागणी येत्या आधिवेशनात करणार आहे. तसेच तालुक्यात सुरु असलेले अवैद्य धंदे बंद करण्यासाठी माजी मोहिम सुरुच राहणार आहे.
मंगेश चव्हाण, आमदार चाळीसगाव

आमदारांनी स्वत: चालवला ट्रक

बुधवारी रात्री आमदार मंगेश चव्हाण यांनी स्वतः अजवड ट्रक चालवत कन्नड घाटात नेला, त्याठिकाणी असलेल्या पोलिसांनी त्यांच्याकडे ५०० रुपयांची मागणी केली.

आमदार पोलिसांना म्हणाले, ‘थोडे कमी करा’ अन् ५०० रुपये पोलिसांच्या हातात दिले. तसेच ‌उर्वरित पैसे परत मागितले असता त्या पोलिसांनी ते देण्यास नकार दिला. नंतर ड्रायव्हर बनलेले आमदार मंगेश चव्हाण यांनी बाजूला उभ्या असलेल्या पोलिसांना जवळ बोलावले व हा बाकी पैसे परत देत नसल्याचे सांगितले, तेव्हा त्यातील एक पोलीस शिवीगाळ करायला लागला मग आमदार मंगेश चव्हाण यांनी खाली उतरून पोलिसांशी बोलायला सुरुवात करताच काही पोलिसांनी आमदारांना ओळखले व त्यांनी पळ काढला.

Video : आमदाराचे स्टिंग ऑपरेशन : पोलिस वाहन चालकांकडून पैसे घेतल्याचे केले व्हिडिओ
तारक मेहतामधील रीटा रिपोर्टने केले दुसरे लग्न

अवजड वाहनांना बंदी असतांना पैसे देऊन सरार्स प्रवास

दुरुस्तीसाठी अवजड वाहनांना प्रवेश बंद असलेल्या कन्नड घाटात पोलिसांकडून ५०० ते १००० रुपये प्रति अवजड वाहन घेऊन त्यांना सोडण्यात येते, यामुळे अनेकदा घाट जाम होऊन ५ ते १० तास घाट जाम होतो. गंभीर रुग्ण घेऊन जाणार्‍या एम्ब्युलन्स तासंतास अडकून पडतात, यामुळे पूर्ण राज्यात चाळीसगाव तालुक्याचे नाव खराब होत आहे. केवळ वसुलीसाठी प्रवाश्यांच्या जीवाशी खेळाचा आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडून स्टिंग ऑपरेशन करत पर्दाफाश केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Video : आमदाराचे स्टिंग ऑपरेशन : पोलिस वाहन चालकांकडून पैसे घेतल्याचे केले व्हिडिओ
माधुरी भाड्याच्या घरात राहणार, महिन्याच्या भाड्यात तुमचे स्वत:चे घर होणार

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com