ना. महाजन म्हणतात..गुलाबभाऊंच्या खांद्यावर मी उभा

ना. महाजन म्हणतात..गुलाबभाऊंच्या खांद्यावर मी उभा

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

जिल्ह्यात मी गुलाबभाऊंच्या (Gulabrao Patil) खांद्यावर उभा आहे. त्यामुळे गुलाब भाऊ मला सांभाळून घ्या (take care of me) असे म्हणत ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन (Rural Development Minister Girish Mahajan) यांनी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Water Supply Minister Gulabrao Patil) यांना दहींडीच्या कार्यक्रमात चिमटा काढला.

शहरातील सागरपार्क मैदानावर एल. के. फाऊंडेशनतर्फे दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन, पाणीपुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील हे एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. पुढे बोलतांना ना. महाजन म्हणले की, या कार्यक्रमात अक्षरश्: तरुणाईचा महापूर आल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी गोविंदाचा समावेश क्रीडामध्ये केल्याचा निर्णय घेतला आहे. मी देखील खेळाडू असून मी देखील दहिहंडी फोडली आहे. मात्र राजकीय जीवनात आता मी जिल्ह्यात गुलाबभाऊंच्या खांद्यावर उभा आहे. त्यामुळे त्यांनी मला सांभाळून घ्यावे अशी कोपरखळी ना. महाजन यांनी ना. पाटलांना काढली.

इंटरनॅशनल क्रिडा संकुलासाठी प्रयत्नशील

जिल्ह्यात इंटरनॅशनल दर्जांच्या स्पर्धा होतील अशा पद्धतीचे इंटरनॅशनल क्रीडा संकुल उभारण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. जेणेकरुन जिल्ह्यातून ऑलम्पिक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पात्रता असलेले खेळाडू तयार व्हावे. यासाठी मी मंत्रीमंडात प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन ना. महाजन यांनी यावेळी दिले.

दहीहंडी हा एकजुटीचा कार्यक्रम- ना. पाटील

दोन वर्षानंतर जल्लोषात साजरा होणार्‍या दहिहंडी उत्सवाला आज ही तरुणाई साक्ष देत आहे. दहीहंडीचा कार्यक्रम हा एकजुटीचा आहे. मुख्यमंत्र्यांनी दहिहंडीच्या पार्श्वभूमीवर गोविंदाचा क्रिडा प्रकारात समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मलाही दहीहंडी फोडायला जावस वाटत आहे. परंतु माझ्याआधीच तो विरु क्रेनवर चढून गेला. त्यामुळे मी थांबून गेलो असेही ना. गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com