आ.खडसेंनी तू-तू, मैं-मैं करण्यापेक्षा काम करु द्यावे!

ना.गिरीश महाजन यांचा खडसेंच्या टीकेवर पलटवार
आ.खडसेंनी तू-तू, मैं-मैं करण्यापेक्षा काम करु द्यावे!

जळगाव jalgaon ।

अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारने (Maha Vikas Aghadi Govt) काय केले आणि काय केले नाही. याकडे आधी खडसेंनी (MLA. Khadse) पहावे. त्यानंतर माझ्यासह गुलाबराव पाटलांवर टीका (Criticism of Gulabrao Patal with me) करावी. खडसेंनी तू-तू, मैं-मैं करण्यापेक्षा आम्हाला जिल्ह्याचा विकास करु द्यावा (Let the district develop). असा पलटवार मंत्री गिरीश महाजन (Minister Girish Mahajan) यांनी केला.

मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर गिरीश महाजन यांचे शुक्रवारी जळगावात आगमन झाले. यावेळी पत्रकारांशी बोलतांना त्यांनी माजी मंत्री एकनाथराव खडसें यांनी केलेल्या वक्तव्याचा चांगलाच खरपूस समाचार घेतला. दरम्यान, खडसेंनी गिरीश महाजन व गुलाबराव पाटील हे यापूर्वी तू-तू, मैं-मैं करत होते व आता दोन्ही एका सरकारमध्ये मंत्री असल्याची बोचरी टीका समाजमाध्यांवर केली होती.

त्याला उत्तर देतांना ना. महाजन म्हणाले की, एकनाथ खडसे यांनी आमच्याकडे पाहण्यापेक्षा आपण काय केले हे अगोदर पाहावे. अडीच वर्षाच्या काळात महाविकास आघाडी सरकारने कुठलाच प्रश्न मार्गी लावलेला नाही. त्यांनी त्याकडे लक्ष देण्याची गरज असून त्यांनी उलट खडसेंनी तू-तू, मैं-मैं न करता आम्हाला काम करु द्यावे असा सल्ला ना. महाजन यांनी दिला.

मंत्री मंडळात पंकजा मुंडे यांच्यासह ओबीसी आमदारांना डावलले जात असल्याची टीका खडसेंनी केली होती. त्यावर ना. महाजन म्हणाले की, मंत्री मंडळात माझ्यासह गुलाबराव पाटील यांच्यासह अनेक आमदार ओबीसी आहेत. अजून काही मंत्र्यांचा शपथविधी होणे बाकी असून त्यात अनेक ओबीसींना संधी मिळणार आहे. त्यामुळे खडसेंनी ओबींसींवर अन्याय होत असल्याची काळजी करु नये असा टोला देखील त्यांनी लगावला.

राज्यातील विविध प्रश्नांसह जळगाव जिल्ह्यातील मेडीकल हबचा प्रश्न अडीच वर्षांपासून रखडला आहे. तो विषयी मार्गी लवणार असून जिल्ह्यातील विकासकामांसाठी तसेच शहराच्या विकासासाठी मोठा निधी आणणार असल्याचे आश्वासन मंत्री गिरीश महाजन यांनी दिले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com