एरंडोल येथे आमदार चषक कबड्डी स्पर्धा

एरंडोल येथे आमदार चषक कबड्डी स्पर्धा
USER

एरंडोल - प्रतिनिधी Erandole

येथे ३३ वी किशोर - किशोरी गट जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धा २०२२ (Kabaddi Tournament) जळगाव जिल्हा कबड्डी असोसिएशन व क्रिडा प्रबोधिनी एरंडोल यांच्या तर्फे आमदार चषक कबड्डी स्पर्धेचे आयोजन रा.ति.काबरे विद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले आहे. सदर स्पर्धा २८ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबर पर्यंत होणार आहे.

याप्रसंगी दि.२८ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ६:०० वाजता क्रिडा व युवक कल्याण मंत्री गिरीष महाजन (Minister Girish Mahajan) यांच्या हस्ते आमदार चषक कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार चिमणराव पाटील (MLA Chimanrao Patil) व खासदार उन्मेष पाटील (MP Unmesh Patil) असतील. क्रीडांगण पूजन मुख्याधिकारी विकास नवाळे यांच्याहस्ते तर नाणेफेक मा.आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाला विविध सामाजिक,राजकीय तथा क्रिडाक्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. समारोप दि.३० ऑक्टोबर रोजी होऊन बक्षिस वितरण आमदार चिमणराव पाटील, अधिकारी, डॉक्टर यांच्या तथा विविध मान्यवरांच्या हस्ते केले जाणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com