आ. भोळे म्हणतात...शहरातील नागरिकांचा अंत बघू नका!

आ. भोळे म्हणतात...शहरातील नागरिकांचा अंत बघू नका!

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

शहरातील नागरिक (citizens) महापालिकेला कर (Tax to the Municipal Corporation) भरतात तर आपण त्यांना चांगले रस्ते, पथदिवे, गटारी, स्वच्छता आदी मुलभूत सुविधा (Providing basic facilities) देणे आपले कर्तव्य (your duty) आहे. याबाबत अनेकदा बैठका (meetings) घेवून तुम्हाला सूचना देवून सुध्दा तुम्ही का काम (not working) करत नाही. यामुळे नगरसेवकांना (corporators) नागरिकांच्या दररोज शिव्या खाव्या लागत आहे. तुम्ही शहरातील नागरिकांचा (Citizens) अंत बघू नका, अशा शब्दात आमदार राजूमामा भोळे (MLA Rajumama Bhole) यांनी महानगरपालिकेत (Municipal Corporation)आढावा बैठकीत (review meeting) अधिकार्‍यांना खडेबोल सुनावले.

महापालिकेत आमदार राजूमामा भोळे यांनी प्रभाग समितीनुसार आढावा बैठक घेतली. यावेळी महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, उपायुक्त, शहर अभियंता, नगरसचना अधिकारी आदी उपस्थित होते. सकाळी अकराला प्रभाग समिती 1 व 2 यांची बैठक घेतली. यावेळी नगरसेवक व त्यांच्या पतीने प्रभागातील समस्यांचा पाढाच वाचून दाखविला. अधिकारी व कर्मचारी ऐकत नसल्याची तक्रार यावेळी केली. तर दुपारी चार वाजता प्रभाग समिती 3 व 4 यांची बैठकीत नगरसेवकांनी खराब रस्ते, खड्डे बुजविणे, अस्वच्छता, बंद पथदिवे आदी समस्यांच्या तक्रारी केल्या.

नगरसेवक डायरी त्वरित सुरू करा

महापालिकेत पूर्वी नगरसेवक डायरी सुरू केली होती. परंतु ती आता बंद आहे. प्रभागातील कामे होता की नाही, कोणते कामे आहे याबाबत अधिकारी व नगरसेवकांचा संपर्क होतो. त्यामुळे दोघांमध्ये समन्वय राहतो आणि प्रभागातील समस्या त्वरित सुटतील. त्यामुळे त्वरित पूर्वीप्रमाणे नगरसेवक डायरी सुरू करा, अशी सूचना आ. भोळे यांनी आयुक्तांना दिली.

मग काय रस्ता चोरीला गेला का?

नगरसेवक राजेंद्र घुगे-पाटील यांनी डि मार्ट ते आदित्य चौकपर्यंतच्या रस्त्याच्या कामांचा मुद्दा उपस्थित केला. रस्ता तयार करण्याचे अर्धवट अंदाजपत्रात कसे तयार केले. अर्धा रस्ता केला बाकीचा का केला नाही, मग काय रस्ता चोरीला गेला का? असा प्रश्न उपस्थित केला. यावेळी महापौरांनी तुम्हाला वाटत असेल तर तक्रार दाखला करा, चौकशी करा असे सांगितल्यावर दोघांमध्ये शाब्दीक चकमक झाली. त्यानंतर महापौर व उपमहापौरांनी अर्धवट राहिलेल्या रस्त्याच्या कामाबाबत माहिती दिली. तसेच महापौरांनी हा रस्ता मुलभूत विकास निधीतून पूर्ण केला जाणार असल्याचे सांगीतले.

मनपा अधिकार्‍यांची कामांची प्रगती नाही

शहरातील विविध समस्यांवर बैठकीत चर्चा सुरू असतांना भाजप नगरसेवक जितेंद्र मराठे यांनी त्यांच्या प्रभागातील समस्या मांडल्या. तसेच अनेक वेळा बैठकी होतात. अधिकार्‍यांना सुचना दिल्या जातात. परंतु यातून अधिकारी व कर्मचार्‍यांच्या कामातून प्रगती दिसत नसल्याने नाराजी व्यक्त केली.

नागरिकांनी शिव्या देवून माझा सत्कार केला

प्रभाग 11 च्या नगरसेविका पार्वता भिल यांनी त्यांच्या भागातील वाघनगर ते रेल्वे पुलापर्यंतच्या खराब रस्त्यांचा प्रश्न उपस्थित केला. तसेच गटारींसाठी अतिक्रमण काढले आहे. पण अधर्वट काम केलेले आहे. तसेच बंद पथदिव्यांवरूनही नागरिकांनी मला शिव्या देेवून माझा सत्कार दररोज करत आहे, असे सांगून त्यांनी व्हीडिओ क्लिपच सभागृहाला यावेळी ऐकवून दाखवली.

वर्क ऑर्डर देवून ही रस्ता का पूर्ण होत नाही

प्रभाग 12 मधील नगरेसविका उज्वला बेंडाळे, गायत्री राणे यांनी यावेळी ऑस्वाद हॉटेल चौक ते गिरणा टाकीपर्यंतचा दयनीय झालेल्या रस्त्याचा प्रश्न उपस्थित केला. हा रस्ता का पूर्ण केला जात नाही. 6 महिन्यापासून वर्क ऑर्डर मक्तेदाराला दिली आहे. याबाबत आमदार भोळेंनी नाराजी व्यक्त करत अधिकार्‍यांना तातडीने हा रस्ता दुरुस्ती करण्याचे सांगून मक्तेदार जर काम करत नसेल तर काळ्या यादीत त्याला टाका, अशा सूचना आमदारांनी दिल्या.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com