एन्.मुक्ता प्राध्यापक संघटनेच्या मू.जे. शाखेकडून कर्तव्य बोध सप्ताहाचा शुभारंभ

एन्.मुक्ता प्राध्यापक संघटनेच्या मू.जे. शाखेकडून कर्तव्य बोध सप्ताहाचा शुभारंभ

जळगाव : jalgaon

अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ,(All India National Federation of Education) नवी दिल्ली या संघटनेशी संलग्नित क.ब.चौ.उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ (North Maharashtra University)परिक्षेत्रात प्राध्यापकांच्या प्रबोधनासाठी आणि समस्या निर्मूलनाचे भरीव कार्य करणाऱ्या एन्.मुक्ता अर्थात नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी अॅण्ड कॉलेज टीचर्स असोसिएशनच्या(N. Mukta Professors Association) मू.जे.महाविद्यालय (M.J. College Jalgaon )शाखेच्या वतीने आज ‘ कर्तव्य बोध दिवस’(Duty Perception Week) साजरा (Celebrate) करण्यात आला.

शिक्षण क्षेत्राला (education sector) भारतीय चेहरा मोहरा आणि मूल्याधिष्ठित अधिष्ठान (Valuable establishment) देण्यासाठी कटिबद्ध असणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ या प्राध्यापक संघटनेकडून 12 जानेवारी स्वामी विवेकानंद जयंती ते 23 जानेवारी सुभाषचंद्र बोस जयंती पर्यंत ‘शिक्षकांसाठी कर्तव्य बोध सप्ताह (Duty Perception Week) साजरा करण्यात येत असतो. या संघटनेचे ‘राष्ट्र के हित में शिक्षा, शिक्षा के हित में शिक्षक और शिक्षक के हित में समाज’ असे ब्रीद आहे.

सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते स्वामी विवेकांनद आणि राष्ट्रमाता जिजाऊ च्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. यावेळी अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती, व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा.प्रदीप खेडकर यांनी उपस्थित प्राध्यापकांची संवाद साधला.

deshdoot logo
deshdoot logo

आपल्या संघटनेच्या विधायक कार्याविषयी सांगितले. ते म्हणाले शिक्षकाचे अधिकार महत्वाचे आहेतच पण त्यांच्या कर्तव्याची जाणीव होणे आणि त्याद्वारे विद्यार्थी, महाविद्यालय, संस्था आणि समाज यांचे हित कसे होईल याचा विचार करणे महत्वाचे आहे. त्यासाठी हा कर्तव्य बोध सप्ताह राष्ट्रीय पातळीवरील कार्यक्रमामध्ये शामिल करण्यात आला आहे. त्यामाध्यमातून संघटनेच्या मूल्याधिष्ठित संघटनात्मक कार्याचा परिचय सदस्यांना होत असतो.

या कार्यक्रमाला अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ महाराष्ट्र प्रांत संघटनेच्या महिला एकक अध्यक्षा आणि अमरावती येथील व्ही.एम.व्ही. कॉलेजच्या प्राचार्या डॉ.स्मिता देशमुख आणि महात्मा फुले महाविद्यालय, अमरावतीच्या प्राचार्या डॉ.मिनल ठाकरे ह्या देखील उपस्थित होत्या.

यावेळी मू.जे.महाविद्यालयाचे प्रा.डॉ. संजय भारंबे, एन्.मुक्ताचे अध्य्यक्ष डॉ.नितीन बारी, क.ब.चौ.उ.म.विचे व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा.डॉ.जे.बी.नाईक, डॉ.अविनाश बडगुजर,मू.जे.स्थानिक शाखा अध्यक्ष डॉ.भूषण कविमंडन, डॉ.कल्पना नंदनवार, डॉ.भाग्यश्री भलवतकर, डॉ.लीना ढाके, डॉ. केतन नारखेडे, डॉ.विद्या पाटील, डॉ.मनोज चोपडा, प्रा.विजय लोहार आणि अन्य सदस्य प्राध्यापक उपस्थित होते.

Related Stories

No stories found.