तोल गेल्याने पाचव्या मजल्यावरुन पडून मिस्तरीचा मृत्यू

गणेश कॉलनीतील घटना; पोलिसात अकस्मासत मृत्यूची नोंद
तोल गेल्याने पाचव्या मजल्यावरुन पडून मिस्तरीचा मृत्यू

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

इमारतीच्या पाचव्या मजल्यावर (fifth floor of the building) प्लास्टर (Plastering)) करीत असतांना तोल जावून (Out of balance) मिस्तरी खाली कोसळल्याची (Mistry fell down) घटना गणेश कॉलनीतील (Ganesh Colony) चंद्रप्रभा सोसायटीत (Chandraprabha Society) मंगळवारी सकाळच्या सुमारास घडली. या घटनेत शेख उस्मान शेख इस्माईल (वय-40, रा. पिंप्राळा हुडको) यांचा जागीच मृत्यू (Death on the spot) झाला. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शहरातील पिंप्राळा हुडको परिसरात शेख उस्मान शेख ईस्माईल हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. शेख उस्मान हे बांधकाम मिस्तरी असून त्यावर त्यांचा उदनिर्वाह करीत होते. गणेश कॉलनीतील चंद्रप्रभा सोसायटीमध्ये टिल्लू शर्मा यांच्या पाच मजली इमारतीचे काम सुरु असल्याने याठिकाणी शेख उस्मान हे काम करीत होते.

नेहमीप्रमाणे शेख उस्मान हा सकाळी कामावर हजर झाला. इमारच्या पाचव्या मजल्यावर प्लॉस्टरचे काम सुरू होते. काम करत असतांना शेख उस्मानचा तोल गेल्याने थेट पाचव्या मजल्यावरून खाली पडला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. सोबत काम करणारे शेख हुसेन यांच्यासह इतर सहकार्‍यांनी तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले.

घटनेमुळे परिसरात हळहळ

पाचव्या मजलवरुन पडून बांधकाम मिस्तरीचा मृत्यू झाल्याच्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मयताच्या पश्चात तीन मुली, दोन मुले, दोन भाऊ असा परिवार आहे. याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com