
अमळनेर : Amalner
अल्पवयीन वयात (Minor girl) तीचे त्याच्याशी सूत जुळले. शाळेत जातांना मैत्रिणीला वर्गात जाण्याचे सांगून ती वही घेण्याच्या निमित्ताने गायब झाली. मुलगी गायब झाल्यानंतर पालकांनी पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्याचवेळी गावातील एक 20 वर्षीय युवकही गायब झाल्याने शंका बळावली. पोलिसांनी तपास सुरू केला. महिन्यानंतर ते दोेघे स्वत:हून पोलिसात हजर झालेत. मुलाने नव्हे तर मीच मुलाला (child) पळवून (abducted) नेल्याचा जबाब मुलीने दिला. मात्र ती अल्पवयीन असल्याने तरूणावर गुन्हा दाखल झाला. ही चित्रपटातील कथा नव्हे तर सत्य कथा आहे. काय आहे प्रकरण ते वाचाच
बहादरपूर नाका येथील मजुरी करणाऱ्या महिलेची साडे सोळा वर्षाची अल्पवयीन मुलगी इंदिरा गांधी शाळेत १२ वी ला शिकत होती. १६ रोजी सकाळी मैत्रीणीबरोबर शाळेत गेली व शाळेत गेल्यावर मैत्रिणीला तू वर्गात जा मला वही घ्यायला जायचे आहे म्हणून तेथून निघून गेली. ती परत आली नाही म्हणून तिच्या आईने शोध घेतला व घरातील वस्तू तपासल्या असता तिने घरातील ९० हजार रुपये आणि सोन्याचांदीचे दागिने सोबत नेल्याचे निदर्शनास आले होते.
त्याचवेळी गल्लीतील सुरेश सोमा कोळी हा तरुण देखील बेपत्ता झाल्याचे समजले. त्यामुळे सुरेशनेच तिला फुस लावून पळवून नेल्याचा संशय येऊन अमळनेर पोलिसात फिर्याद दिल्याने सुरेश विरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुरेश आणि तरुणी महिनाभरपासून पुण्याला राहत होते. ते दोघे स्वतःहून धरणगाव पोलीस स्टेशनला हजर झाले होते.
मुलाने नव्हे तर मीच नेले मुलाला पळवून
धरणगाव पोलिसांनी त्यांना अमळनेर पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलीस उपनिरीक्षक अक्षदा इंगळे यांच्यासमक्ष अल्पवयीन मुलीचा जबाब घेण्यात आला त्यात तिने मीच मुलाला पळवून नेले होते असा जबाब दिला होता.
मुलीच्या जबाबवरून ग्रामीण रुग्णालयात तिची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. ती अल्पवयीन असल्याने सुरेश कोळी विरुद्ध अपहरण सह ,बलात्कार ,पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्या एस बी गायधनी यांनी चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अल्पवयीन मुलीला महिला बाल कल्याण समिती जळगाव यांच्याकडे पाठवण्यात आले आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक अक्षदा इंगळे करीत आहेत.