ऐनपुर येथे अल्पवयीन मूलीवर अत्याचार

निंभोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
ऐनपुर येथे अल्पवयीन मूलीवर अत्याचार

निंभोरा Nimbhora बु।।ता. रावेर (वार्ताहर)

   ऐनपुर (Ainpur) ता. रावेर येथील एका चाळीस वर्षीय व्यक्तीने (forty-year-old man) अल्पवयीन 14 वर्षीय मुलीवर (minor girl)  अत्याचार (torture) केल्याची घटना ऐनपुर  शिवारात घडली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की ऐनपुर ता रावेर येथे  दिनांक 17 रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास आरोपी नितीन मधुकर पाटील (वय 40) याने व  सहकारी महिला (वय 30) आरोपीने  यांनी संगनमत करून पुरुष आरोपीच्या शेतात ऐनपुर शिवारात  बोलावून  महिला आरोपीने अल्पवयीन मुलीस काड्यावेचण्याच्या उद्देश्याने बोलावून आरोपी  नितीन पाटील याने अश्लील बोलून सदर पीडित  बालिकेवर जबरदस्ती ने अत्याचार केला.

सदर घटना बाबत निंभोरा पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्याने  आरोपी विरुद्ध   भाग 5 गु.र.नं. 170/22 भादवी कलम 376 , तसेच बालकांचे लैंगिक अत्याचार कायदा अधिनियम  कलम  4,6 तसेच अनु. जाती जमाती कायद्यानव्ये गुन्हा दाखल झाला असून आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे .

पुढील तपास जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली फैजपूर पोलीस उपविभागीय अधिकारी कुणाल सोनवणे  व  निंभोरा पोलीस सपोनी गणेश धुमाळ व पोलीस तपास करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com