मंत्री गिरीश महाजनांनी जळगावकरांना दिला पुन्हा 'हा' शब्द

मंत्री गिरीश महाजनांनी जळगावकरांना दिला पुन्हा 'हा' शब्द

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

जळगाव शहरातील (Jalgaon city) विकासकामांसंदर्भात भाजपाचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (BJP Rural Development Minister Girish Mahajan) यांनी पुन्हा एकदा शहरवासियांना शब्द दिला आहे. पुढील सहा महिन्यात जळगावातील रस्त्यांसह (roads) इतर सर्व विकासकामे (Development work completed) पूर्ण करणार असल्याचे ना. महाजन यांनी आज माध्यमांशी बोलतांना सांगितले. दरम्यान गत महापालिका निवडणुकीवेळी मंत्री असतांना गिरीश महाजन यांनी असाच शब्द दिला होता. मात्र तो त्यांनी पाळला नसल्याने आता पुन्हा दिलेला शब्द कसा पाळतील? याविषयी शहरवासियांमध्ये चर्चा होत आहे.

जळगाव शहरातील खराब झालेले रस्ते, रखडलेला विकास हा थेट विधानसभेपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे एकेकाळी नावलौकीक असलेल्या जळगावची राज्यभरात नाचक्की होत असल्याचे दिसून येत आहे. माजी मंत्री सुरेशदादा जैन हे काही दिवसांपूर्वी जळगावला आले होते. त्यांनी देखिल जळगावच्या दुरावस्थेबद्दल खंत व्यक्त केली होती.

महाजनांचा शब्द अन् नागरिकांच्या उंचावल्या भुवया

सन 2018 मध्ये महापालिकेची निवडणूक जिंकल्यानंतर भाजपाचे मंत्री गिरीश महाजन यांनी वर्षभरात शहराचा चेहरामोहरा बदलवून दाखवू अन्यथा विधानसभेसाठी मत मागायला येणार नाही असे जाहीरपणे सांगितले होते. याच शब्दावर जळगावकरांनी मोठा विश्वास ठेवत जळगावची जागेवर भाजपाचे राजुमामा भोळे यांना निवडून दिले होते. मात्र दोन वर्षातच महापालिकेतून भाजपाला सत्तेतून पायउतार व्हावे लागले.

मंत्री गिरीश महाजनांनी दिलेला शब्द ते पूर्ण करू न शकल्याने भाजपाविषयी याकाळात मोठी नाराजी निर्माण झाली. आता पुन्हा त्याच मंत्री गिरीश महाजन यांनी महिनाभरात 150 कोटी रूपये आणून सहा महिन्यात जळगावातील विकासकामे पूर्ण करण्याचा शब्द देत जळगावकरांना दिवास्वप्न दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळेला तरी मंत्री गिरीश महाजन शब्द पाळतील का? असा प्रश्न शहरवासियांच्या मनात निर्माण झाला आहे.

पालकमंत्र्यांनी दिला 70 कोटींचा निधी

जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मंत्रीपदाच्या कार्यकाळात जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सर्वाधिक 70 कोटींचा निधी महापालिकेला दिला आहे. तरी देखिल महापालिकेच्या गलथान कारभारामुळे या निधीतील कामेही रखडली आहे. यासोबतच भाजपाचे आमदार राजूमामा भोळे यांनी नुकताच रस्त्यांसाठी 10 कोटींचा निधी मंजूर करून आणला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर निधी येऊनही कामे का होत नाही? असा प्रश्न शहरवासियांना पडला आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com