कार्तिक स्वामींचे लाखो भाविकांनी घेतले दर्शन

केरळी महिला ट्रस्टच्या कार्तिक स्वामी मंदिरात आज समारोप
 कार्तिक स्वामींचे लाखो भाविकांनी घेतले दर्शन

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

शहरातील निवृत्तीनगरमधील केरळी महिला ट्रस्टचे (Kerala Women's Trust) कार्तिक स्वामी मंदीर (Kartik Swami Temple) 18 नोव्हेंबर रोजी कार्तिका पौर्णिमेला सुरू झाले असून दोन दिवसात लाखो भाविकांनी (Millions of devotees) कार्तिक स्वामींचे (Kartik Swami) दर्शन (Darshan) घेतले. दि.20 नोव्हेंबर रोजी समारोप (Conclusion) होऊन मंदिराचे व्दार पुन्हा बंद करण्यात येणार आहे. यावेळी शासनाचे नियमांचे काटेकोर पालन करण्यात आले.

संपुर्ण केरळी पध्दतीने बांधलेले हे मंदिर गेल्या 25 वर्षापासून कार्तिकी पौर्णिमेनिमित्त दर्शनासाठी खुले करण्यात येते. या मंदिरात कार्तिकस्वामी व्यतिरीक्त नवग्रह व इतर देवतांची देखिल मंदिर असून ते वर्षभर दर्शनासाठी खुले असते. या मंदिरात दर्शनासाठी दरवर्षी भाविक दूरदेशातून मोठया प्रमाणात येत असतात. येथे केलेेला नवस पुर्ण होतो अशी आख्यायीका आहे.कार्तिक पौर्णिमानिमित्त मंदिरात दि. 18 रोजी दु. 12 वा मंदिराचे व्दार दर्शनासाठी उघडण्यात आले असून 19 नोव्हेंबर रोजी दिवसभरात लाखो भाविकांनी कोविड नियमांचे पालन करीत दर्शनाचा लाभ घेतला. गेल्या दोन दिवसापासून संस्थापक अध्यक्ष वासंती अय्यर यांच्या मार्गदर्शनाखाली केरळी महिला ट्रस्टच्या सदस्या व कार्यकर्ते हा उत्सव शांततेत पुर्ण होण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेे.

भगवान कार्तिक स्वामींवर अभिषेक

केरळी महिला ट्रस्टच्या कार्तिक स्वामी मंदिरात भाविकांसाठी मंदिरातच मोकळया जागेत अभिषेकाची व्यवस्था करण्यात आली होती. आज अनेक भाविक भगवान कार्तिक स्वामींवर अभिषेक करतांना दिसून येत होते. अनेक मान्यवरांनी मंदिरात येवून दर्शनाचा लाभ घेतला. यात आमदार राजूमामा भोळे, महापौर जयश्री महाजन, माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांच्यासह मान्यवरांनी मंदिरात जावून पूजाअर्चा केली. शनिवारी समारोप होणार आहे.

पांजरापोळ संस्था

श्री पांजरापोळ संस्थेचे पुरातन काळातील कार्तिक स्वामींचे मंदिर आहे. कार्तिक पौर्णिमेनिमित्त कार्तिक स्वीमींचे मंदिर गुरुवारी दुपारी 2.30 वाजता उघडण्यात आले होते. शुक्रवारीही भाविकांनी कार्तिक स्वीमींचे दर्शन घेतले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com