
मुक्ताईनगर Muktainagar
जिल्हा दूध उत्पादक संघाच्या ( District Milk Producers Union) निवडणुकीत (election) शेतकरी पॅनलचा ()Farmers Panel दणदणीत विजय (resounding victory) झाल्याने मुक्ताईनगर शहरात फटाक्यांची आतषबाजी (Fireworks display) करून जल्लोष करण्यात आला.याप्रसंगी वाद्याच्या तालावर कार्यकर्त्यांसह आमदार चंद्रकांत पाटीलही (MLA Chandrakant Patil ) थिरकले. दुध तूप लोण्यात ताव मारणाऱ्यांचा पराभव झाला अशी आ.पाटील यांनी तर विकासावर खोक्याचा विजय झाल्याची प्रतिक्रिया आ.खडसे यांनी दिली.
संपूर्ण जिल्ह्याचेच नव्हे तर राज्याचे लक्ष जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीकडे लागून होते. या निवडणुकीत आमदार एकनाथराव खडसे यांच्या सहकार पॅनलला पराभवाचा सामना पत्करावा लागला तर आमदार चंद्रकांत पाटील यांच्या शेतकरी पॅनलला विजयाचा मान प्राप्त झाला निकाल घोषित होता बरोबर मुक्ताईनगर शहरातील प्रवर्तन चौकात आमदार चंद्रकांत पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी महात्मा ज्योतिबा फुले राजर्षी शाहू महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या अर्धाकृती पुतळ्यांना पुष्पमाला अर्पण करून विनम्र अभिवादन केले व त्यानंतर फटाक्यांची आतिशबाजी करण्यात आले यावेळी कार्यकर्त्यां सह आमदार चंद्रकांत पाटील यांनीही वाद्याच्या तालावर ठेका घेत विजयाचा जल्लोष केला.
दूध तूप लोण्यात भ्रष्टाचार करणाऱ्यां चा पराभव -- आ.चंद्रकांत पाटील
जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीत विजय प्राप्त झाल्यानंतर आमदार चंद्रकांत पाटील यांनी , " मंत्री गिरीश महाजन मंत्री गुलाबराव पाटील आणि ज्यांनी नेतृत्व केलं त्या सर्वांच्या अथक प्रयत्नाने विजयाची माळ शेतकरी पॅनलच्या गळ्यात पडली ज्यांनी दूध संघात दूध तूप आणि लोण्यात भ्रष्टाचार केला त्यांना मतदारांनी घरचा रस्ता दाखवला आहे आज मुक्ताईनगर तालुका खऱ्या अर्थाने मोकळा श्वास घेत आहे, "अशी प्रतिक्रिया दिली.
याप्रसंगी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या सोबत तालुकाप्रमुख छोटू भोई नानासाहेब देशमुख नगरसेवक राजेंद्र हिवराळे नगरसेवक संतोष मराठे अफसर खान नगरसेवक पियुष महाजन गोपाळ सोनवणे प्रवीण चौधरी प्रशांत पाटील यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
...हा तर विकासावर खोके भारी पडले -- आ. एकनाथराव खडसे
जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघात मतदारांनी दिलेला कौल आम्हाला मान्य आहे पराभव आम्हाला मान्य आहे जळगाव जिल्ह्याच्या इतिहासातील ही निवडणूक अतिशय वेगळी ठरली आम्ही गेल्या सात वर्षात दूध विकास झाला विकासाकडे नेलं दूध संघाला 92 कोटींवर नेला विकास घडवून आणला परंतु विकासावर खोके भारी पडले आणि आमच्या पॅनलला पराजयाचा सामना करावा लागला परंतु एकदा पराभव झाल्याने मी घाबरणारा नाही यापूर्वीही मी अनेक निवडणुका लढलो आहे निवडणुकीत जय विजय झाले त्यांचे अभिनंदन परंतु आम्ही दूध संघाला 100 कोटी वर नेले त्यांनी 200 कोटीवर नेऊन शेतकऱ्यांचे हित साधावे अशी प्रतिक्रिया आमदार एकनाथराव खडसे यांनी दैनिक देशदूतशी बोलताना दिली.
याप्रसंगी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष एडवोकेट रवींद्र पाटील सोबतच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.