दुध भेसळीचा गोरखधंदा : बिडगावात चौघांना अटक

11 लाखांचा मुद्देमाल जप्त
दुध भेसळीचा गोरखधंदा : बिडगावात चौघांना अटक

अडावद/धानोरा Adavad

गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्यात भेसळयुक्त दुधाचा (adulterated milk) पुरवठा होत असल्याच्या तक्रारी येत असतानाच चोपडा तालुक्यातील बिडगाव (Bidgaon) शिवारातील कुंड्यापाणी येथे दुधात भेसळ (adulterated milk) करणार्‍या ठिकाणावर धाड (Raid) टाकत पोलिसांनी (police) चार जणांना अटक (Arrested) करीत 11 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मात्र पोलिसांचा सुगावा लागताच यातील एक जण फरार होण्यात यशस्वी झाला.

अन्न सुरक्षा अधिकारी (Food Safety Officer) जळगाव, पोलीस महानिरिक्षकांचे विशेष पथक (Special Squad of Inspector General of Police) (नाशिक)व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व अडावद पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही विशेष कारवाई (Action) केली.या रॅकेट मध्ये काही नामवंत डेअरी चालकांचा सहभाग असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे.

बिडगाव शिवारातील कुंड्यापाणी येथे संभाजी मोतीराम पाटील (Sambhaji Motiram Patil) यांच्या शेतात लक्ष्मण देवा भरवाड (रा. पळासनेर) हा हस्तकामार्फत पाम तेल, दुध पावडरचे मिश्रण करुन दुधात भेसळ (Adulterated in milk) करत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे दि.24 रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास पोलिसांच्या विशेष पथकाने धाड (Raid) टाकली असता. भेसळयुक्त दुध, तसेच खाद्यतेल, दुध पावडर, मिक्सर, दुधाचे 54 कॅन, बादल्या, दुधाच्या वाहतुकीसाठी असलेल्या दोन बोलेरो मालवाहू गाड्या, मोबाईल असा तब्बल 11 लाख 18 हजार 235 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत (Material seized) केला.

यावेळी भिकन अशोक साळुंके (चिंचोली), हेमंत रतीलाल महाजन (धानोरा), सारा बुटा भरवाड(लिंबडी, गुजरात), हर्षल पंढरीनाथ पाटील (चिंचोली) यांना अटक करण्यात आली असून लक्ष्मण देवा भरवाड (रा. पळासनेर ता. शिरपूर हा फरार आहे. यांच्या विरुध्द अडावद पोलीस ठाण्यात भादवी 272, 273, 328, 420, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तीन तालुक्यातील डेअरी चालकांचा सहभाग?

सदर रॅकेट अतिशय गंभीर असून चौकशी अंती सत्य समोर यईलच.यात चोपडा, यावल व आणखी एका तालुक्यातील नामवंत दुध डेअरी चालकांचा (Milk Dairy Operators) सहभाग असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. त्यामुळे या बड्या माशांवर जाळे टाकले जाईल का? असा सवाल ही उपस्थित होत आहे.एवढ्या मोठ्या प्रमाणावर भेसळयुक्त दूध डेअरीत जाऊन ही ते समजले नाही का?किती दिवसांपासून हा गोरखधंदा(Gorakhdhanda) सुरू होता. हे दुध जेथे जात होते तेथीलही कोणाचा यात सहभाग होता का? अश्या अनेक प्रश्नांचे उत्तरे समोर येण्याची आवश्यकता आहे.

एका कॅनपासून बनवत होते 30कॅन दुध

एक कॅनमध्ये (cans) दुध पावडर व पामतेल अशी भेसळ (Counterfeiting) करून. ती भेसळ 30 कॅनमध्ये पाणी घेऊन त्यात हि भेसळ टाकून चक्क 30 कॅनचे चक्क दुध बनवून ते डेअरीला देण्याचा हा गोरखधंदा सूरू होता.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com