
जळगाव jalgaon । प्रतिनिधी
एमआयडीसी पोलीस ठाण्याचे (MIDC Police Station) पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे (Police Inspector Pratap Shikare)यांची मुक्ताईनगर येथे उपविभागीय अधिकारी (Muktainagar Sub Divisional Officer) म्हणून पदोन्नती (Got promoted) झाली आहे. त्यांच्या रिक्त झालेल्या जागी अमळनेर पोलिस ठाण्याचे (Amalner Police Station) पोलीस निरीक्षक जयपाल हिरे (Police Inspector Jaipal Hire) प्रभारी म्हणून (Appointment as in-charge) नियुक्ती झाली आहे. याबाबतचे आदेश सायंकाळी उशिरा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी काढले.
जिल्ह्यातील सर्वात मोठी हद्द आणि संवेदशनील पोलीस ठाणे म्हणून एमआयडीसी पोलीस ठाण्याची ओळख आहे. या पोलीस ठाण्याची धूरा सांभाळण्यासाठी पोलीस दलातील अधिकार्यांमध्ये स्पर्धा सुरु असते.
दरम्यान, गेल्या महिन्यात या पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांची मुक्ताईनगरच्या उपविभागीय अधिकारी म्हणून पदोन्नती झाली आहे. परंतु त्यांना पदोन्नतीच्या ठिकाणी नियुक्त करण्यात आले नव्हते. तसेच पोलीस ठाण्याची धूरा आपल्याला मिळावी यासाठी जिल्हाभरातील पोलीस निरीक्षकांकडून प्रयत्न सुरु होते. तर कर्मचार्यांना देखील उत्सुक्ता लागून होती.
अमळनेरचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब झाले असून त्यांना तात्पुरत्या स्वरुपात प्रभारी अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हिरे यांची ओळख पोलिस दलात अत्यंत शिस्तप्रिय अधिकारी अशी आहे. याबाबतचे आदेश गुरुवारी सायंकाळी पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी काढले आहे.