व्यापारी गाळे, आकृतिबंधाचा प्रश्न निकाली लागण्याची शक्यता

मनपा आयुक्तांनी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांची घेतली भेट
व्यापारी गाळे, आकृतिबंधाचा प्रश्न निकाली लागण्याची शक्यता

जळगाव jalgaon। प्रतिनिधी

महानगरपालिकेच्या (Municipal Corporation) अनेक प्रलंबित प्रश्नांसाठी (pending questions) मनपा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड (Municipal Commissioner Dr. Vidya Gaikwad) यांनी नगरविकास विभागाच्या प्रधानसचिव सोनिया सेठी (Principal Secretary, Urban Development Department Sonia Sethi) यांची सोमवारी भेट घेवून चर्चा केली. दरम्यान, व्यापारी गाळे, आकृतीबंध, विशेष लेखा परीक्षणाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याची आयुक्तांनी विनंती केली. यावर प्रधानसचिवांनी सकारात्मकता (Positivity) दर्शविली असून, येत्या आठ दिवसात हे प्रलंबित प्रश्न निकाली लागण्याची शक्यता आहे.

महापालिकेच्या मुदत संपलेल्या व्यापारी संकुलाचा प्रश्न गेल्या 12 वर्षांपासून प्रलंबित आहे. व्यापारी गाळ्यांसदर्भात राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळात लक्षवेधी उपस्थित केली होती. यावर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी समिती गठीत करुन समितीकडून अहवाल मागविला होता.

दरम्यान, गाळ्यांचा प्रश्न प्रलंबित असल्यामुळे महापालिकेचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे गाळ्यांचा प्रश्न लवकर मार्गी लावावा अशी मागणी आयुक्तांनी केली आहे. तसेच सद्यास्थितीला महापालिकेत मनुष्यबळाचा अभाव आहे. त्यामुळे आकृतीबंधाला तातडीने मंजुरी द्यावी. त्याबरोबरच विशेष लेखा परिक्षण अहवालाबाबत प्रलंबित प्रश्नही निकाली काढावा.

शिवाय महापालिकेत उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्तांचे रिक्त असलेल्या पदांवर नियुक्ती करावी. अशी मागणी देखील मनपा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी नगरविकास विभागाच्या प्रधानसचिव सोनिया सेठी यांच्याकडे केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com