मर्सिडीजची मोटारसायकलला धडक : दोन युवक ठार

मर्सिडीजची मोटारसायकलला धडक : दोन युवक ठार

एरंडोल Erandole

जळगाव कडून नासिक येथे भरधाव वेगाने जाणा-या मर्सिडीज (Mercedes car) कारने मोटारसायकलला (motorcycle) समोरून दिलेल्या धडकेत शेतातून घराकडे जाणारे दोन युवक जागीच ठार झाले (Two youths killed) तर एक जण गंभीर जखमी झाला.जखमीस जळगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.हा अपघात सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महार्गावरील पिंपळकोठा गावाजवळ झाला.अपघातानंतर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काल ठप्प झाली होती. 

 याबाबत माहिती अशी,कि आज सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास नितीन जामसिंग पाटील वय २५,घनश्याम भानुदास बडगुजर हे दोन युवक मोटरसायकलने घरी जात होते तर नारायण धनसिंग पाटील वय २५ वय-२४ हा युवक रस्त्याच्या कडेने पायी शेतात जात होता.पिंपळकोठ्याजवळील नाल्याजवळ जळगाव येथून नासिककडे भरधाव वेगाने येणा-या मर्सिडीज कार क्रमांक एम.एच.१५ एच.वाय.०७०० ने मोटरसायकलला समोरून जोरदार धडक दिली. मर्सिडीज कारने धडक दिल्यामुळे मोटर सायकलचे अक्षरश: तुकडे झाले आणि मोटर सायकलवरील नितीन जामसिंग पाटील व घनश्याम भानुदास बडगुजर दोन्ही.रा.पिंपळकोठा हे दोन युवक जागीच ठार झाले.

तर रस्त्याच्या कडेने शेतात पायी जाणरे नारायण धनसिंग पाटील हे गंभीर जखमी झाले.अपघातानंतर जोरदार आवाज झाल्यामुळे पिंपळकोठा येथील ग्रामस्थांनी अपघातस्थळी जाऊन मदतकार्य सुरु करून जखमीस जळगाव येथे रवाना केले.जिल्हा परिषदेचे माजी सदस्य नाना महाजन,संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष संभाजी पाटील यांनी अपघाताची माहिती पोलिसाना दिली.

अपघाताची माहिती मिळताच महेंद्र पाटील,रवींद्र तायडे,जुबेर खाटिक,धर्मेंद्र ताकुर,हेमंत घोंघडे यांनी अपघातस्थळी धाव घेवून मृतदेह बाहेर काढले आणि विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत केली.अपघातात मयत झालेले दोन्ही युवक अविवाहित होते.नितीन पाटील याचे पच्छात आई,वडील,भाऊ व विवाहित बहिण असा परिवार आहे तर घनश्याम बडगुजर याचे पच्छात आई,वडील,व बहिण असा परिवार आहे.गंभीर जखमी झालेल्या नारायण पाटील याचा ३१ तारखेला विवाह आहे.

याबाबत गजानन जगन्नाथ बडगुजर यांनी दिलेया तक्रारीवरून मर्सिडीज कार चालाकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार महेंद्र पाटील व त्यांचे सहकारी करीत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com