Murder खर्चासाठी पैसे देत नसल्याने मुलांनीच बापाला संपवले

मेहुणबारे पोलिसानी आठ तासातच खूनाचा केला उलगडा, फिर्यादीच निघाले आरोपी
Murder खर्चासाठी पैसे देत नसल्याने मुलांनीच बापाला संपवले

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

आई व दोन्ही मुलांकडून दररोज शेतीमध्ये काबाडकष्ट करुन घेत असे, परंतु घरखर्चाकरीता, कपडयांकरीता अथवा वैदयकीय उपचारांकरीता वेळोवेळी पैसे मागुन देखील ते वडिल पैसे देत नसल्याने तसेच वारंवार आईला व मुलांना शिवीगाळ करुन मारहाण करीत असल्याने वडीलांचा काटा काढण्याचा कट करुन दोन्ही मुलांनी दि.८ जून २०२३ रोजी पहाटे ०३ ते ०४ वा. च्या सुमारास वडील शेतामध्ये एकटे झोपलेले असतांनाच दोन्ही मुलांनी वडीलांचे डोक्यात लोखंडी पाईपने गंभीर दुखापत करुन नंतर दोरीच्या सहाय्याने गळा आवळून खुन केल्याचेे मेहुणबारे पोलिसांच्या तपासात उलड झाले आहे. गुन्हां दाखल झाल्यानतंर अवघ्या आठ तासातच खूनाचा उलगडा केल्यामुळे मेहुणबारे पोलिसांचे विशेष कौतूक होत आहे.

Murder खर्चासाठी पैसे देत नसल्याने मुलांनीच बापाला संपवले
Breaking news चाळीसगाव तालुक्यात दोघांचा खून

दि.८ रोजी चिंचखेड शिवारातील शेतगट नंबर २७ मध्ये मळयात झोपण्यासाठी गेलेले शेतकरी राजेंन्द्र सुखदेव पाटील वय ५० रा. देवळी ता.चाळीसगाव हया शेतकर्‍याचा अज्ञात इसमांनी काहीतरी टणक वस्तुने डोक्यावर मारुन, गळा आवळून निर्घुन खुन केला होता. त्यावरुन मयताचा मोठा मुलगा मुकेश राजेंद्र पाटील याने माझ्या वडीलांचा कोणीतरी अज्ञात आरोपीतांनी खुन केला आहे बाबत दिलेल्या लेखी तक्रारी वरुन मेहुणबारे पोलीस ठाणेस गु.र.नं. १४१/२०२३ भा.द.वी. कलम ३०२ प्रमाणे अज्ञात इसमांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. शेतकर्‍याची हत्या झाल्याने परिसरात अज्ञात आरोपीतांविरुध्द संतापाची लाट येवुन भितीचे वातावरण निर्माण झाले होते. मेहुणबारे पोलीसांना घटनेची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी धाव घेवुन तपास चालु केला होता.

सदर खुनाचे गुन्हयाचे गांभीर्य ओळखुन जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार साहेब यांनी जिल्हा पोलीस यंत्रणेला योग्य ते मागदर्शन करुन गुन्हा उघडकीस आणणे कामी केलेले मागदर्शन व सुचनांप्रमाणे अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे साहेब, सहा. पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख साहेब, शहर वाहतुक शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक तुषार देवरे, सहा. पोलीस निरीक्षक विष्णु आव्हाड, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश चव्हाणके यांनी घटनास्थळी भेट देवुन घडल्या परिस्थीतीचे बारकाईने पाहणी केली व तपासकामी फॉरेन्सीक टिमला पाचारण करुन आरोपीतांचे तपासकामी वेगवेगळी पथके तयार करुन गोपनिय यंत्रणेमार्फत गुन्हयाचा तपास सुरु करण्यात आला होता.

गुन्हयाचे घटनास्थळी भेट देणारे अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे साहेब व अपर पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख साहेब यांनी बारकाईने घटनास्थळाची पाहणी केल्यावर तेथे आढळून आलेले भौतीक पुरावे व रक्ताने माखलेल्या लाकडी काठया, दोरी, तसेच कांदा चाळीचे तुटलेले कुलुप व तेथील कपाशीच्या अस्ताव्यस्त पडलेल्या गोण्या हयांचे बारकाईने निरीक्षण केले असता, खुनाचा बनाण केल्याचे दिसुन येत असल्याने वरिष्ठ अधिकार्‍यांनी स्वतः सदर ठिकाणी तळ टोकुन सर्व तपास पथकांना त्या दृष्टीने तपास करण्याच्या सुचना देवुन घटनास्थळी हजर असलेले मयताचे मुलांकडे गुन्हयाबाबत विचारपुस करता, त्यांचे जबाबांमध्ये आढळून आलेली विसंगती व त्यांच्या सदर ठिकाणच्या संशयास्पद हालचालींवरुन त्यांच्यावर लक्ष केंन्द्रीत करुन गावामध्ये त्यांच्या विषयीची माहिती एकत्रीत केली असता, यातील मयत व त्याचे मुलांमध्ये वारंवार वाद होत असल्याची माहीती मिळून आली. त्यावरुन दोन्ही मुलांवर लक्ष केंन्द्रीत करुन त्यांच्या आढळून आलेल्या संशयास्पद हालचाली व त्यांच्या जबाबातील विसंगती वरुन मयताचा मोठा मुलगा फिर्यादी मुकेश राजेंन्द्र पाटील (वय २३) व राकेश राजेंन्द्र पाटील (वय २१) यांना चौकशीकामी ताब्यात घेवुन गुन्हयाबाबत विचारपुस करता, सुरुवातीस त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र त्यांना अधिक विश्वासात घेवुन ते सांगत असलेल्या हकीगती मध्ये व घडलेली घटना याबाबत दिसुन येत असलेली परिस्थीती यावरुन कसोशीने तपास करता, त्यांनी गुन्हयाची कबुली देवुन आमचे वडील राजेंन्द्र सुखदेव पाटील हे आमच्या आईकडून व आमच्याकडून दररोज शेतीमध्ये काबाडकष्ट करुन घेत असे परंतु आम्हाला घरखर्चाकरीता, कपडयांकरीता अथवा वैदयकीय उपचारांकरीता वेळोवेळी पैसे मागुन देखील ते आम्हाला पैसे देत नसल्याने तसेच वारंवार आईला व मुलांना शिवीगाळ करुन मारहाण करीत असल्याने वडीलांचा काटा काढण्याचा कट करुन दोन्ही मुलांनी दिनांक ०८/०६/२०२३ रोजी पहाटे ०३-३० ते ०४-०० वा. च्या सुमारास वडील शेतामध्ये एकटे झोपलेले असतांना मुकेश राजेंन्द्र पाटील व राकेश राजेंन्द्र पाटील यांनी मळयात मोटार सायकलवर जावुन वडीलांचे डोक्यात लोखंडी पाईपने गंभीर दुखापत करुन नंतर दोरीच्या सहाय्याने गळा आवळून खुन करुन परत रात्री घरी येवुन झोपले. सदर खुन कोणीतरी अज्ञात इसमांनी कपाशी चोरण्याचे इरादयाने केल्याचा देखावा तयार केल्याची देखील कबुली दिली असुन यातील फिर्यादीच आरोपी असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने दोन्ही आरोपीतांना रात्री उशिरा अटक करण्यात आली असुन पुढील तपास चालु आहे.

या पथकाने केली विशेष कामगिरी-

वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे मेहुणबारे पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक विष्णु आव्हाड, पोलीस उप निरीक्षक प्रकाश चव्हाणके, शहर वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक तुषार देवरे, तसेच सहा.पो.उप निरीक्षक मिलींद शिंदे, सुभाष पाटील, दिलीप सोनवणे, पोहवा. योगेश मांडोळे, पोकॉ.गोरख चकोर, कमलेश राजपुत, भुषण बावीस्कर, दिपक महाजन, निलेश लोहार, योगेश बोडके, प्रविण पाटील, हनुमंत वाघेरे, जितेंन्द्र परदेशी, ईश्वर देशमुख, ज्ञानेश्वर बडगुजर, दिपक नरवाडे, शैलेश माळी, होमगार्ड महेंन्द्र पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे सहा.पो.उप निरीक्षक अनिल जाधव, सुधाकर अंभोरे, लक्ष्मण पाटील यांचे पथकाने मेहनत घेवुन कौशल्याने गुन्हा उघडकीस आणला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com