महापौर जयश्री महाजन यांचा अभ्यास कमी

भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सुर्यवंशी यांचा टोला
जयश्री महाजन
जयश्री महाजनJayashri Mahajan

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

जळगाव शहराचे आ.राजूमामा भोळे (MLA Rajumama Bhole) यांच्यावर विकास निधी (Development Fund) आणल्यासंदर्भात जळगावच्या सुशिक्षित महापौर जयश्री महाजन (Mayor Jayashree Mahajan's) यांनी बिनबुडाचे आरोप (Baseless accusations) केलेले आहे. महापौरांनी आधी अभ्यास करावा, (studies are lacking) असा टोला भाजपा जळगाव जिल्हा महानगर जिल्हाध्यक्ष (BJP Jalgaon District Mahanagar District President) दीपक सुर्यवंशी (Deepak Suryavanshi) यांनी पत्राद्वारे केला आहे.

जळगाव महानगरपालिकाचे महपौर जयश्री महाजन या सुशिक्षित असून त्यांना माहीत असावे की, आ.राजूमामा भोळे यांनी जळगाव शहराच्या विकासासाठी 2014 ते 2022 पर्यंत अनेक कोटी रुपयांचे कामे केलेली आहेत. हे त्यांना ज्ञात असावे. मात्र, सर्वप्रथम मनपामध्ये भाजपची सत्ता असताना जे.डी.सी.सी. बँक हुडकोचे कर्ज कोणी फेडले? शिवाजीनगर व पिंप्राळा उड्डाण पुलासाठी निधी कोणी दिला.

शहरातल्या मेहरूण तलाव विकास व सुशोभीकरणासाठी 5 कोटीचा निधी कुठून आला? विविध कामाच्या माध्यमातून 500 कोटींपेक्षा जास्त निधी जळगाव शहरासाठी आ.राजूमामा भोळे यांनी उपलब्ध करून दिले आहे. युती सरकारच्या काळात 100 कोटी रुपये निधी मंजूर करून शहरात 42 कोटीचे कामे सुरु होणार आहेत हे आपल्याला माहित असावे. तसेच जळगाव शहराच्या रस्त्यासाठी 5 कोटी निधी नुकताच मंजूर केला.

तसेच महाराष्ट्राचे नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जळगाव शहराच्या विकास आराखड्यासाठी 100 कोटीच्या निधीची मागणी नुकतीच आ. भोळे यांनी केली असून या सर्व गोष्टीचा अभ्यास महापौरांनी करावा.आ.राजूमामा भोळे हे कोणत्याही पक्ष व जातीपातीचे राजकारण करत नसून त्यांचा हेतू फक्त हा जळगाव शहराचा विकास हाच आहे.

आ. भोळे यांनी सर्व पक्षाच्या लोकांना निधी दिला असून शहराचा विकास हेच सबका साथ, सबका विकास हे भारतीय जनता पक्षाचे ब्रीद वाक्य असून जयश्री महाजन या सत्ताधारी महापौर असून त्यांनी मनपामध्ये आ. राजूमामा भोळे यांनी शहराच्या विकासासाठी किती निधी आणलेला आहे,याचा सखोल अभ्यास करावा. सुशिक्षित असून अज्ञाणी व्यक्तीसारखे बिनबुडाचे आरोप केलेले आहेत, असे भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सुर्यवंशी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com