महापौर जयश्री महाजनांकडून जळगावकरांची दिशाभूल

प्रत्युत्तर । भाजपासह शिंदे गटाच्या नगरसेवकांचा आरोप
जयश्री महाजन
जयश्री महाजनJayashri Mahajan

जळगाव jalgaon। प्रतिनिधी

शहरात विकासकामे (development work) करण्यास महापौरांना अपयश (Failure of the mayor) आल्यामुळे नागरिकांच्या प्रश्नांना सामोरे कसे जाणार ? या चिंतेमुळेच महापौर जयश्री महाजन पालकमंत्री गुलाबराव पाटील (Guardian Minister Gulabrao Patil) यांच्यावर चुकीच्या पध्दतीने टीका (criticizing) करत आहेत. पालकमंत्र्यांनी महापालिकेला भरघोस निधी (Substantial funds)दिला हे सांगणार्‍या महापौर जयश्री महाजन यांनी घुमजाव (wandering around) करीत निधीच्या विषयावरून पालकमंत्र्यांवर खोटे आरोप केले आहे. महापौर जयश्री महाजन यांच्याकडून जळगावकरांची दिशाभूल (Misguided by Jalgaoners) केली जात असल्याचा खळबळजनक (Accusation) आरोप शिंदे गटासह भाजपाच्या नगरसेवकांनी (BJP corporators with Shinde group) आज एका पत्रकार परिषदेत केला.

महापौर जयश्री महाजनांकडून निधीच्या विषयावरून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर बेछुट आरोप केले होते. या आरोपांना भाजपासह शिंदे गटाच्या नगरसेवकांनी पत्रकार परिषद घेत उत्तर दिले आहे. यावेळी नीलेश पाटील, भाजपचे नगरसेवक राजेंद्र घुगे-पाटील, विशाल त्रिपाठी, अ‍ॅड.दिलीप पोकळे, जितेंद्र मराठे, नवनाथ दारकुंडे, चेतन सनकत, कुंदन काळे, गणेश सोनवणे आदी उपस्थित होते.

जयश्री महाजन
Visual Story # क्रितीचा ‘ठुमकेश्वरी’ अंदाज पाहिलात का?

पालकमंत्र्यांनी महापालिकेला 61 कोटी रुपयांचा निधी दिल्यावर महापौरांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची स्तुती केली होती. मात्र, आता त्यांच्याच अपयशामुळे त्यांना तो निधी खर्च करता आला नाही. पालकमंत्र्यांनी दिलेला निधी जर यांना खर्च करता येत नसेल तर ते महापौरांसह मनपातील सत्ताधार्‍यांचे अपयश असल्याचा आरोप शिंदे गटाचे पदाधिकारी नीलेश पाटील यांनी केला.

जयश्री महाजन
श्री मंगळ ग्रह मंदिरात झाला तुळशी चा शाही विवाह महासोहळा

महापौरांना ओपन चॅलेंज महापौर जयश्री महाजन म्हणतात की शिंदे गटात येण्यासाठी पालकमंत्र्यांकडून दबाव टाकला जात आहे. मात्र त्यांनी कुणाचा फोन आला? कुणी दबाव टाकला? त्यांची नावे जाहीर करावी असे आमचे ओपन चॅलेंज असल्याचेही नीलेश पाटील यांनी सांगितले. महापौरांचा प्रशासनावर वचक नसल्यानेच अधिकारी काम करीत नाहीत. महासभांमध्ये अनेक ठेकेदारांवर आम्ही कारवाईची मागणी करूनही त्यांच्यावर कारवाई होत नसल्याची माहिती अ‍ॅड. दिलीप पोकळे यांनी दिली.

जयश्री महाजन
प्रकल्पग्रस्तांना प्रशिक्षण घेता-घेता केले सेवानिवृत्त

दानवेंनी केलेल्या उद्घाटनाचा निधी पालकमंत्र्यांचाच

उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी त्यांच्या वॉर्डात नुकतेच विकासकामांचे विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या हस्ते उद्घाटन केले. ज्या कामांचे उद्घाटन झाले त्या कामांसाठीही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीच निधी दिला असल्याचेही नीलेश पाटील यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com