जिल्ह्यातील 1122 गावांमध्ये पाण्याचा सर्वाधिक उपसा

उपसा असलेली गावे डार्कझोनमध्ये तर, 413 गावे सेफ झोनमध्ये
जिल्ह्यातील 1122 गावांमध्ये पाण्याचा सर्वाधिक उपसा

जळगाव jalgaon। प्रतिनिधी

जिल्ह्यात (district) 1535 गावांपैकी 1122 गावांमध्ये (villages) 90 ते 100 टक्क्यांपेक्षा पाण्याचा अधिक उपसा (More water abstraction) होत असल्याची माहिती भूजल मुल्यांकनाच्या (Groundwater assessment) माध्यमातून समोर आली आहे. दरम्यान, ही गावे डार्कझोनमध्ये (Darkzone) समाविष्ट करण्यात आली असून, केवळ 413 गावे सेफ झोनमध्ये आहेत.

जिल्ह्यातील पाण्याच्या उपलब्धतेबाबत दर पाच वर्षांनी भूजल मुल्यांकन केले जात होते. आता मात्र सुधारीत आदेशानुसार दर दोन वर्षांनी भूजल मुल्यांकन वरिष्ठ भूवैज्ञानिक विभागाकडून केले जाते. सन 2019-20 च्या भूजल मुल्यांकनानुसार अती शोषित (100 टक्के पेक्षा जास्त उपसा), शोषित 90 ते 100 टक्के उपसा, अंशतः शोषित 70 ते 90 टक्के उपसा सुरक्षित 60 ते 70 टक्के किंवा 60 टक्के पेक्षा कमी उपसा अशी पाणलोट क्षेत्रानुसार वर्गवारी करण्यात आली आहे. जिल्ह्यात 66 पाणलोट क्षेत्र आहेत. या पाणलोट क्षेत्रात असलेल्या गावांमधील उपसा भूजल मुल्यांकनानुसार ठरविला जातो.

असे ठरते भूजल मूल्यांकन

भूजल मुल्यांकन ठरवितांना गावामधील सरासरी पर्जन्यमान, पीकपेरा आणि पाण्याचा उपसा या तीन बाबी ग्राह्य धरल्या जातात. या तिन्ही बाबींचा अभ्यास केल्यानंतर संबंधीत गाव कोणत्या वर्गवारीत आहे हे निश्चित करुन भूजल मुल्यांकन ठरविले जाते. तसेच भूजल मुल्यांकनाचा अहवाल शासनाकडे पाठवून त्यानुसार पाणलोट क्षेत्रात विहीरी देणे, सिंचनाचे लाभ देणे हे निश्चित केले जाते. सन 2022 मध्ये गावांचे भूजल मुल्यांकन करण्याचे काम सुरु आहे.

सिंचनाचे लाभ मिळण्यावर मर्यादा

भूजल मुल्यांकनानुसार डार्कझोन आणि सेफझोन अशी वर्गवारी झाल्यानंतर विहीर, सिंचनाचे इतर लाभ देण्यावर निर्णय घेतला जातो. जी गावे डार्कझोनमध्ये आहेत. त्या ठिकाणी सिंचनाचे लाभ मिळण्यावर मर्यादा येतात. तर सेफझोनमध्ये असलेल्या गावांना मात्र, पाणलोट क्षेत्रात सिंचन विहीरी घेता येवू शकतात.

या तालुक्यातील गावे सुरक्षित

जिल्ह्यातील 413 गावांमध्ये पाण्याचा कमी उपसा आहे. त्यामुळे ही गावे सुरक्षित आहेत. यात भुसावळ, जामनेर, जळगाव, यावल, पाचोरा, चोपडा, एरंडोल, धरणगाव, अमळनेर, पारोळा, मुक्ताईनगर, चाळीसगाव या तालुक्यातील गावांचा समावेश आहे. या तालुक्यातील गावे सेफझोनमध्ये आहेत.

243 गावे अतिशोषित

भूजल मुल्यांकनानुसार जिल्ह्यातील आठ पाणलोट क्षेत्रातील 243 गावांमध्ये 100 टक्क्यापेक्षा अधिक पाण्याचा उपसा होत असल्याने या गावांचा अती शोषित वर्गवारीत समावेश करण्यात आला आहे. तर, दोन पाणलोट क्षेत्रातील 65 गावे शोषित, 33 पाणलोट क्षेत्रातील 814 गावे अंशतः शोषित अशी एकूण 1122 गावे डार्कझोनमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. तर 23 पाणलोट क्षेत्रातील 413 गावे ही सुरक्षित म्हणजेच सेफ झोनमध्ये समाविष्ट आहेत. यात रावेर तालुक्यातील 119 गावांमध्ये 100 टक्क्यांपेक्षा अधिक पाण्याचा उपसा होत आहे. तर जळगाव तालुक्यातील 18 आणि अमळनेर तालुक्यातील 47 गावांमध्येही 90 ते 100 टक्के पाण्याचा उपसा केला जातो.

पाणलोट क्षेत्रातील डार्कझोनमध्ये असलेली गावे वगळण्यासाठी पाण्याचा उपसा कमी झाला पाहीजे. उपसा कमी झाल्यास अशी गावे डार्कझोनमधून वगळून त्यांना सिंचनाचे लाभ मिळू शकतात.

अनुपमा पाटील, वरिष्ठ भूवैज्ञानिक

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com