
जळगाव jalgaon । प्रतिनिधी
माझ्याशी लग्न (marry me) कर म्हणत तालुक्यातील एका गावातील तरुणाने (youth) 23 वर्षीय विवाहितेचा विनयभंग (molestation) करत तिचे वडील व भाऊ यांना शिवगीाळ तर विवाहितेच्या पतीला दमदाटी केल्याची घटना घडली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव तालुक्यातील एका गावात विवाहिता आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास आहे, दि. 18 नोव्हेंबर 2022 रोजी विवाहिता सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घरासमोर उभी असतांना कानळदा येथील किरण हिरामण पाटील हा तरुण आला.
त्याने विवाहितेला उद्देशून तु माझ्याशी लग्न कर, असे म्हणत विवाहितेचा डावा हात धरुन तिचा विनयभंग केला, यादरम्यान किरण यास बोलले असता, त्याने विवाहितेचे वडील, तसेच चुलत भाऊ यांना शिवीगाळ केली, तसेच किरण याने विवाहित तरुणीचे पती यांना फोनवरुन दमदाटी केली.
या घटनेप्रकरणी तब्बल तीन महिन्यानंतर विवाहित तरुणीने तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून यावरुन किरण हिरामण पाटीलरा. कानळदा ता. जळगाव याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ बापू पाटील हे करीत आहेत