किरकोळ वादामुळे विवाहितेची आत्महत्या

किरकोळ वादामुळे विवाहितेची आत्महत्या

जळगाव । Jalgaon । प्रतिनिधी

घरात किरकोळ वाद (minor dispute ) झाला या वादातून संतापाच्या भरात आशा विशाल इंगळे (वय-22, रा. जिजाऊ नगर) या विवाहितेने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शहरातील वाघ नगर (Wagh Nagar) परिसरातील जिजाऊ नगरात (Jijau Nagar) आशा विशाल इंगळे ह्या पती विशाल, सासू सासरे आणि दीर यांच्यासह वास्तव्याला आहे. पती विशाल मिळेल ते काम करून आपला उदरनिर्वाह करतात. शनिवारी दि. 7 मे रोजी सकाळी 9 वाजता घरात किरकोळ कारणावरून आशा इंगळे यांचा घरात वाद झाला होता. त्यांनी संतापाच्या भरात घराच्या वरच्या मजल्यावर जावून दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली.

हा प्रकार त्याची दिरानी मनिषा यांच्या लक्षात आल्याने त्यांनी आरडाओरड केली. शेजारी राहणार्‍या नागरीकांनी धाव घेवून आशाबाई यांना खाली उतरवून खासगी रूग्णालयात (private hospital) उपचारार्थ दाखल करण्यात आले. रात्री 10 वाजेच्या सुमारास त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविलेल्या आशा इंगळे यांना तीन वर्षांचा चिमुकला ओम नावाचा मुलगा आहे. त्यांच्या पश्चात पती, सासू, सासरे, दीर, दिरानी असा परिवार आहे. रविवारी सकाळी जिल्हा शासकीय रूग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.