पाण्याचा ॲक्वा जार प्लॅन्टसाठी विवाहितेचा छळ

पतीसह सासरच्या सात जणांविरोधात गुन्हा दाखल
पाण्याचा ॲक्वा जार प्लॅन्टसाठी विवाहितेचा छळ

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

तालुक्यातील पिंपरखेड येथील माहेरवाशिन असलेल्या २५ वर्षीय विवाहितेचा (nashik) नाशिक येथील सासरच्या मंडळीनी पाण्याचा (Aqua jar plant) ॲक्वा जारचा प्लॅन्ट टाकण्यासाठी माहेरुन पैसे आनले नाहीत, म्हणून शारीक व मानसिक छळ केला. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण (police) पोलीस स्टेशन पतीसह सासरच्या सात जणांविरोधात गुन्हां दाखल करण्यात आला आहे.

प्रियंका निलेश दाणे(२४) रा.पिंपरखेड हिचा विवाह झाल्यापासून साधरणता; दि,४/५/२०१५ पासून ते फेबुवारी २०२१ पर्यंत सासर मंडळीनी पाण्याचा ॲक्वा जारचा व्यवसाय टाकण्यासाठी माहेरुन पैसे अनावेत म्हणून वेळोवेळा शारीक व मानसीक छळ केला. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला विवाहितेच्या फिर्यादीवरुन पती निलेश अशोक दाणे, सासरे अशोक भाका दाणे, सासू लता अशोक दाणे, जयश्री अशाके दाणे सर्व रा.नाशिक, शुभांगी रविंद्र पगारे रा.नाशिक, मन्सवी रविंद्र आहिरे रा.नाशिक, काजल राहुल शेजवल रा.नंदुरबार यांच्याविरोधात भादवी कलम ४९८ प्रमाणे गुन्हां दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com