ग्रामविकास मंत्र्यांच्या जळगाव कार्यालयावर 21 रोजी मोर्चा

ग्रामपंचायत कर्मचार्‍यांच्या प्रलंबित मागण्यासाठी पदाधिकार्‍यांचा निर्धार
ग्रामविकास मंत्र्यांच्या जळगाव कार्यालयावर 21 रोजी मोर्चा

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

ग्रामपंचायत कर्मचार्‍यांच्या (Gram Panchayat employees) प्रलंबित मागण्यासाठी (demands) येत्या दि.21 मे रोजी जळगाव येथील ना. गिरीश महाजन (MLA Girish Mahajan) यांच्या कार्यालयावर प्रचंड मोर्चा (Huge march) नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मोर्चाची नोटीस ना.महाजन यांच्या कार्यालयाला बजावण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे (Maharashtra State Gram Panchayat Employees Federation) पदाधिकारी रविवारी दुपारी 1 वाजता धडकले.

ग्रामविकास मंत्र्यांच्या जळगाव कार्यालयावर 21 रोजी मोर्चा
VISUAL STORY : ५४ व्या वर्षीही या अभिनेत्रीने गुलाबी साडीत तापवलं वातावरण
ग्रामविकास मंत्र्यांच्या जळगाव कार्यालयावर 21 रोजी मोर्चा
VISUAL STORY : आज आहे या लिंबु कलर अभिनेत्रीचा वाढदिवस... करिअरच्या यशोशिखरावर असतांनाच लग्न करून झाली अमेरीकेत सेटल

यावेळी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे कार्याध्यक्ष कॉ.मिलिंदकुमार गणवीर, महासचिव कॉ.नामदेवराव चव्हाण, संघटन सचिव कॉ. सखाराम दुर्गुडे, सचिव नीळकंठ ढोके, उपाध्यक्ष वसंतराव वाघ, सचिव कॉ.अमृत महाजन जळगाव यांचे उपस्थितीत ना.महाजन यांचे संपर्क कार्यालयाचे स्वीय सहाय्यक अरविंद देशमुख तसेच अमोल सोनवणे यांना कर्मचार्‍यांच्या मागण्यांचे सविस्तर निवेदन सादर करण्यात आल. अभय यावलकर समितीच्या शिफारशी अमलात आणा व नगरपरिषद कर्मचार्‍यांप्रमाणे वेतनश्रेणी सहित अन्य लाभ द्या,10 ऑगस्ट 2020 रोजी मान्य केलेले किमान वेतन 2018 पासून लागू करावायास हवे होते ते 10 ऑगस्ट 2020 ला काही केले व अंमलबजावणी जून 2022 ला केली.

ग्रामविकास मंत्र्यांच्या जळगाव कार्यालयावर 21 रोजी मोर्चा
VISUAL STORY : हास्य जत्रेतील प्राजक्ताचा हा लुक पाहाल तर... काळीज होईल खल्लास...

सप्ताह महिन्याच्या किमान वेतनाची थकबाकी द्या, ग्रामपंचायत कर्मचार्‍यांच्या पगारासाठी वसुलीची अट रद्द करा, लोकसंख्येच्या जाचक आकृतीबंध रद्द करा, किमान वेतनाची मुदत फेब्रुवारी 2023 ला संपत असल्यामुळे नवीन सुधारित किमान वेतनासाठी समिती कायम करा आदी मागण्याचा समावेश आहे.

या मागण्यांसाठी येत्या 21 मे रोजी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातून पंधरा हजार कर्मचारी ग्रामीण विकास मंत्री ना.गिरीश महाजन यांच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढतील, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे .त्यावेळी पद्मालय रेस्ट हाऊस मध्ये राज्याचे नेते व जळगाव जिल्हा पदाधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली.

जळगाव येथील राज्यव्यापी मोर्चा यशस्वी करण्याच्या निर्धार करण्यात आला. त्यासाठी राज्य सचिव कॉ.अमृत महाजन, जिल्हाध्यक्ष कॉ. संतोष खरे, जिल्हा सहसचिव राजेंद्र खरे, जिल्हा उपाध्यक्ष किशोर कंडारे, वाल्मिकी समाज सरपंच शंकर दरी यांची मोर्चा समिती तयार करण्यात आली. त्यावेळी सर्वश्री कॉ. ज्ञानदेव शिरसागर, लहू गायकवाड, राजू पाटील, निलेश पाटील व निलेश गोपाळ, उखा धिवर, चंदू खरे आदी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com