मराठी बिग बॉस कलाकार मिनल शहा हलविणार शिवजन्माचा पाळणा

अमळनेर नाट्यगृहाच्या प्रांगणात साजरा होणार शिवजन्मोत्सव सोहळा
मराठी बिग बॉस कलाकार मिनल शहा हलविणार शिवजन्माचा पाळणा

अमळनेर । प्रतिनिधी amalner

शहरातील मानाची सार्वजनिक शिवजयंती उत्सव (Shiva Jayanti celebration) समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहाच्या प्रांगणात 19 फेब्रुवारीला सकाळी 9 वाजता शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात येणार असून या सोहळ्याला (Marathi Bigg Boss artist) मराठी बिग बॉस कलाकार मिनल शहा (Minal Shah) उपस्थित राहणार आहे. तर विविध महापुरुष, महानायिकांच्या वेशात येणार्‍या सर्व मुलामुलींना यावेळी बक्षिसे देण्यात येणार आहेत.

दरवर्षी भव्य मिरवणूक शहरातून निघते. मात्र यंदा (corona) कोरोनाच्या नियमांच्या पार्श्वभूमीवर समितीतर्फे मिरवणूक ऐवजी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथे जागेवरच महिला, युवती आणि शिवप्रेमींच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव सोहळा होणार आहे.

शिव जन्माचा पाळणा यावेळी मराठी बिगबॉस कलाकार मिनल शहा हिच्या हस्ते हलविण्यात येईल. तर यावेळी विविध क्षेत्रातील महिला शिवजन्माचा पाळणा गातील. तसेच शिवजन्मानिमित्त राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ, बाल शिवाजी राजे यांच्या रथासमोर यावेळी आदिवासी टिपरी (Dance) डान्स पथक विविध कसरती करून आंनदोत्सव साजरा करतील.

यावेळी सायरदेवी (Bohra Central School) बोहरा सेंट्रल स्कुलचे विद्यार्थी पोवाडा व नृत्य सादर करतील. खान्देश रक्षक संघटनेचे निवृत्त जवान सुव्यवस्था सांभाळतील तर शिजन्मोत्सवासाठी येणार्‍या सर्व शिवभक्तांनी कोविड नियमांचे पालन करून उत्सव साजरा करावा, असे आवाहन अमळनेरची मानाची सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीतर्फे करण्यात आलेले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com