रावेरात अनेकांचे फेसबुक अकाउंट हॅॅक

रावेरात अनेकांचे फेसबुक अकाउंट हॅॅक

रावेर| Raver प्रतिनिधी-

शहरातील डॉक्टर्स,राजकीय मंडळी यांचे फेसबुक अकाउंट (Facebook accounts) हॅॅक (hacked) होत असल्याची नवी अडचण आता समोर येत आहे.संबंधिताच्या नावांवर थेट पैशांची मागणी (Demand for money) केली जात असल्याने,याकडे आता पोलिसांनी (police) लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.

येथील माजी नगराध्यक्ष शीतल पाटील,बालरोग तज्ञ दिगंबर पाटील,लखन सावळे यांच्यासह याआधी पत्रकार यांचेही अकाउंट हॅॅक झाले आहे.त्यांच्या अकाउंटवरून थेट मित्रांना मेसेज पाठवून पैशांची मागणी केली जात आहे.यामुळे सबंधित युझर आणि त्यांचे मित्र देखील या बुचकळ्यात पडले आहे. या घटना दिवसेंदिवस वाढत आहे,याकडे सायबर क्राईम शाखेने लक्ष देऊन,सोशल मिडिया वापरकर्त्यांची फसवणूक टाळण्यासाठी सहकार्य करावे अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com