मंगरूळ धरण ओव्हर फ्लो

मंगरूळ धरण ओव्हर फ्लो

रावेर | प्रतिनिधी raver

तालुक्यातील (Bhokar River) भोकर नदीवरील मंगरूळ धरण (Mangrul Dam) ओव्हर फ्लो झाले आहे. जोरदार पावसाने सर्वच धरणातील पाणी साठा वाढला आहे .तर सुकी आणी अभोडा धरणाची पातळी वाढली आहे.

तालुक्यात संततधार व रात्री पडलेल्या मुसळधार पावसामुळे मंगरुळ धरण ओव्हर फ्लो झाले आहे. तर सुकी व अभोरा धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे.

मंगरूळ धरणाच्या सांडव्या वरून चार इंचावरून पाणी भोकर नदीत वहात आहे. यामुळे भोकर नदी दुथडी भरून वहात आहे. यामुळे मंगरूळ, केऱ्हाळे बुद्रुक, केहाळे खुर्द, रावेर, तामसवाडी, भोकरी, पुनखेडा, पातोंडी, बोरखेडा या गाव शेती शिवारातील भुजल पाणी पातळी वाढण्यास मदत होणार आहे.

दरम्यान तालुक्यातील गारबर्डी येथील सुकी धरणात ८७ टक्के तर अभोरा धरणात ५९.२६ टक्के पाणी साठा झाला आहे. यामुळे शेतकरी वर्गात उत्साहाचे वातावरण आहे. काल राजी तालुक्यात दमदार पाऊस पडला आज अखेर २०१.८१ मिमी. (३० टक्के) पाऊस पडला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com