मांडूळ सापाची तस्करी करणारी टोळी गजाआड

मांडूळ सापाची तस्करी करणारी टोळी गजाआड

जळगाव jalgaon। प्रतिनिधी

मुक्ताईनगर शहरात बर्‍हाणपूर रस्त्यावरील पेट्रोलपंपासमोर मांडूळ सापाची (Mandul snake ) तस्करी करणार्‍या टोळीला (smuggling gang) मुक्ताई नगर वनपरिक्षेत्राच्या गस्ती पथकाने शनिवारी अटक केली. त्यांच्याकडून मांडळू साप हस्तगत करण्यात आला असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुक्ताईनगर वनपरिक्षेत्रातील मुक्ताईनगर शहरात बर्‍हाणपुर रस्त्यालगत असलेल्या पेट्रोलपंपासमोर मांडूळ सापाची तस्करी करीत असल्याची माहिती वनपरिक्षेत्र मुक्ताईनगर व गस्तीपथकाला मिळाली. या पथकाने सापळा रचून संशयित विजससिंग मोरसिंग राठोड, योगेश फुलसिंग राठोड, शांताराम बळीराम राठोड व रुपेश मदन राठोड सर्व रा. मोरझिरा ता. मुक्ताईनगर जि. जळगाव यांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून मांडूळ साप हस्तगत करण्यात आला आहे. त्यांच्याविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 चे कलम 9, 39, 48, 49, 50, 51 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या पथकाची कारवाई

ही कारवाई वनसंरक्षक अधिकारी वि. वि. होशिंग, सहाय्यक संरक्षक यू. एम. बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी कृपाली शिंदे, मानद वन्यजीव रक्षक विवेक देसाई, वनपाल दिपश्री जाधव, वाय. जी. दिक्षीत, तुळशीराम घरझाळे, नितीन खंडारे, उल्हास पाटील, संचलाल पवार, शंकर कोळी, रायसिंग पारधी, नरेंद्र बरी, जितेंद्र धांडे, वाहन चालक नबाब पिंजारी, योगेश जाधव यांच्या पथकाने केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com