अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍या नराधमास दहा वर्षाची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍या नराधमास दहा वर्षाची शिक्षा
शिक्षा

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

अल्पवयीन मुलीला a minor girl लग्नाचे आमिष lure of marriage दाखवित पळवून नेत तिच्यावर अत्याचार Atyācāra करणार्‍या विजय निंबा ठाकरे Vijay Nimba Thackeray (वय 21) यास शुक्रवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. एन. खडसे District and Sessions Judge d. N. Khadse यांच्या न्यायालयाने दहा वर्ष सश्रम कारावासाची Laborious imprisonment शिक्षा सुनावली.

लग्नाचे आमिष दाखवून विजय निंबा ठाकरे या तरूणाने अल्पवयीन मुलीस पळवून नेले होते. याप्रकरणी 10 जून 2019 रोजी पीडितेच्या वडीलांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. 12 जूनला दोघांना नातेवाईकांनी मुलीच्या वडीलांकडे घेऊन आले.

त्यानंतर पीडिता ही अल्पवयीन असताना सुध्दा तिच्यावर विजय याने अत्याचार केल्याची बाब समोर आली. ही माहिती चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात व न्यायालयात नोंदविण्यात आली व नंतर पळवून नेल्याच्या दाखल गुन्ह्यात अत्याचाराचा वाढीव कलम लावण्यात येऊन दोषारोपपत्र जळगावातील विशेष न्यायालयामध्ये दाखल करण्यात आले होते.

15 जणांची साक्ष ठरली महत्वपूर्ण

न्यायालयात खटला सुरू झाल्यानंतर सरकारपक्षातर्फे एकूण 15 साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. यामध्ये पीडिता तिचे वडील, शाळेचे मुख्याध्यापक, वैद्यकीय अधिकारी, तपासी अंमलदार, न्यायवैज्ञानिक प्रयोग शाळेचे तज्ज्ञ यांच्या साक्ष महत्वपूर्ण ठरल्या.

पिडीतेच्या वयावरुन युक्तीवाद

बचाव पक्षातर्फे पीडिताच्या वयासंदर्भात दोन वेगवेगळे जन्म तारखा दिसून येत असल्याने व पीडितेची न्यायालयात झालेल्या साक्षीवरून ती सज्ञान असून तिच्या संमतीने सदरची घटना घडली असल्याने आरोपीला दोषी धरता येणार नाही असे सांगून इतर अनेक मुद्दयांवर युक्तीवाद केला होता.

मात्र सरकारपक्षातर्फे अ‍ॅड. नीलेश चौधरी यांनी युक्तीवादादरम्यान जेव्हा पीडितेच्या वयासंदर्भात संभ्रम निर्माण होईल. त्यावेळी उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालय विधी संघर्ष संदर्भात मार्गदर्शक तत्वे ठरवून दिलेली आहे. याचे दाखल देवून न्यायालयास पीडिता ही अज्ञान असल्याचे पटवून दिले. त्यानंतर न्यायाधीश डी.एन.खडसे यांनी सरकार पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरून विजय ठाकरे दोषी ठरवून शुक्रवारी शिक्षा सुनावण्यात आली.

अशी सूनावली शिक्षा

अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी बालक लैगिंक गुन्ह्यापासून संरक्षण कायदा- 2012 कलम 3 (अ) मध्ये दोषी धरून कलम 363 खाली सात वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा व 3 हजार रूपयांचा दंडाची शिक्षा सुनावली.

दंड न भरल्यास दोन महिन्यांची साधी कै द तसेच पोक्सो कमल (अ) मध्ये दहा वर्ष सश्रम कारावास व दोन हजारांचा दंड, दंड न भरल्यास दोन महिन्यांची साध्या कैदेची शिक्षा सुनावली आहे. याप्रकरणी सरकारपक्षातर्फे अ‍ॅड. नीलेश चौधरी यांनी कामकाज पाहिले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com