अल्पवयीन मुलीस पळवून नेणाऱ्यास अटक

पोक्सो अंतर्गत चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल.
अल्पवयीन मुलीस पळवून नेणाऱ्यास अटक

पिंपळगाव हरे Pimpalgaon Hare| ता. पाचोरा |वार्ताहर

पिंपळगाव हरे पोलीस स्टेशन (Pimpalgaon Hare Police Station) अंतर्गत अल्पवयीन मुलीस पळवून (Minor girl ran away) नेणार्‍या आरोपीस (Accused) पोलिसांनी औरंगाबाद येथून अटक (Arrested) केली आहे. तसेच आरोपीसह आरोपीस सहकार्य करणार्‍या एक महिला व अन्य दोन जणाविरुद्ध गुन्हा दाखल (Filed a crime) करण्यात आला आहे.

आरोपींवर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कलमान्वये भा.द.वि.कलम ३७६(२)(J) (N), ३७६(३),३६३,३६६, बालकांचे लैंगिक गुन्ह्या पासुन संरक्षण अधिनियम सन २०१२ चे(पोक्सो) गुन्हा पिंपळगाव हरे पोलीस स्टेशन ला दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार योगेश रमेश बेडवाल, वय २२ वर्षे, रा. भिलदरी, ता कन्नड, जि. औरंगाबाद,याने पिडीत अल्पवयीन मुलीस पळवुन लैंगिक अत्याचार केला. पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला औरंगाबाद येथून अटक केली. मुलीला पळून नेण्यास मदत करणारा व आश्रय देणाऱ्या अजय रमेश बेडवाल वय १९ वर्षे रा टिटवाळा मांडा,याला टिटवाळा येथून अटक केली.

अल्पवयीन मुलीस पळून नेण्यास मदत करणारी महिला काजल बन्सीलाल मोची, वय २९ वर्षे, धंदा- शिवणकाम हिस डांभुर्णी येथून अटक केली. आरोपी जय हरिचंद वाघ, वय २९ वर्ष, धंदा रा. कोलवाडी ता कन्नड जि औरंगाबाद सदर आरोपीस अटक केली.

सदर गुन्ह्याचा तपास स.पो.नि. कृष्णा भोये यांचे मार्गदर्शनाखाली पो.उप.नि. दिगंबर थोरात हे करीत आहे. सदर गुन्ह्याच्या तपासकामी त्यांना विजय माळी, पोना शिवनारायण देशमुख, पोना रविंद्रसिंग पाटील, पो.शि. संभाजी सरोदे, म.पो.शि. योगिता चौधरी यांनी मदत केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com