संगणक प्रणालीत बिघाड : महाराष्ट्रातील लाखो रेशन दुकानातुन धान्य वाटप ठप्प!

संगणक प्रणालीत बिघाड : महाराष्ट्रातील लाखो रेशन दुकानातुन धान्य वाटप ठप्प!

संजयसिंग चव्हाण

भुसावळ । Bhusaval

राज्यातील गोर गरीब जनतेला अल्प दरात धान्य (Grains at low prices) उपलब्ध व्हावे म्हणुन राज्य शासनाची महत्वकांक्षी योजना म्हणुन स्वस्त धान्य (Cheap grain) वितरण प्रणाली (delivery system) आहे. मात्र सतत अडचणीत असणारी ही योजना गेल्या दोन अडिच महिन्यापासुन संगणक प्रणालीत (computer system) तांत्रिक अडचण (Technical difficulty) येत असल्यामुळे संपुर्ण महाराष्ट्राचे रेशन वाटप (Disruption of ration distribution) विस्कळीत झालेले आहे. यामुळे या योजनेवर अवलंबुन असणार्‍या गरीब जनतेची दोन वेळच्या अन्नाची भ्रांता झाली आहे.

प्रत्येक गरीबाला त्याच्या हक्काचे धान्य मिळावे यात अफरातफर होऊ नये म्हणुन शासनाने ई पॉस मशिन दुकानदारांना देऊन यंत्राद्वारे नियंत्रण व ठसे घेऊन धान्य वाटप सुरु केले आहे. मुळात अनेक दुकानदार हे अप्रशिक्षीत आहे. त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो त्यात महसुलच्या पुरवठा विभागाच्या जाचक नियमांचा ससेमिरा असतो.

यात भरीस भर जुन, जुलै व ऑगष्ट महीण्यांमध्ये वारंवार सर्व्हर फेल होत आहे. सर्व्हर फेल झाल्यानंतर दुकानावर आलेल्या गरजुस धान्य वितरीत करता येत नाही.

तहसीलकडुन दुकानदारांना दरमहा लिस्ट व धान्याचा पुरवठा करण्यात आला आहे. परंतु हा साठा संगणक प्रणालीच्या बिघाडामुळे ई पॉस मशिन मध्ये धान्य दिसत नाही. यामुळे वाटप प्रलंबीत होत आहे. नॉमिनीची समस्या कायम आहे. वाटप होत नसल्याने राज्य भरातील हजारो दुकानांमध्ये लाखो पोते धान्य पडुन आहे. महसुल मात्र त्यांच्या गोडाऊनला जागा शिल्लक नसल्याने दुकानदारांवर दबाव टाकुन माल घेण्यास बाध्य करत आहेत.

सर्व्हरच्या या समस्सेमुळे डिव्हाईस मॅपिंग न होणे, नॉमिनी अपडेशन न होणे व मशिन अपडेशन होत नसल्याने धान्य वाटपास अडचणी येत आहेत. सध्याचा जमाना फाईव्ह जी चा असताना रेशन दुकानदार जिओ चे टु जी चे राऊटर वायफाय वापरताना दिसुन येत आहेत.वायफाय चे पैसे दुकानदारालाच भरावे लागतात.

संबधीत ठेकेदार हे ही पैसे हडप करतो. रेशनच्या या अडचणीमुळे लाखो गरीब या योजनेपासुन वंचित रहात असुन दररोज दुकानदारांचा ग्राहकाशी वाद होत आहे. बंगलुर मधील एका कंपनीने हा ई पॉस चा मक्ता घेतलेला आहे. ही प्रणाली त्वरीत दुरुस्त करावी जेणे करुन गोरगरीब जनतेच्या तोंडी सणासुदी तरी दोन घास मिळतील अशी आशा दुकानदार व्यक्त करीत आहेत.

दुकानदार व लाभार्थ्यामध्ये वादविवाद-दरमहा धान्य घेण्याची सवय लाभार्थ्यांना असते मात्र आता वितरण प्रणाली कोसळल्याने अंतोदय, प्राधान्य लाभार्थी, एपीएल या योजणांचे धान्य नियमीत येत नाही त्यात मशिन खराब असल्याने लाभार्थी व दुकानदारांमध्ये दररोज वादविवाद होत आहेत. दुकानात माल दिसतो मात्र वाटप होत नसल्याने गैरसमज वाढत आहे.

जानेवारी महिन्यातील सर्व कोटा हडप

रेशन धान्य पुरवठा करण्याचा मक्ता पुर्वी तालुकास्तरावर होता तो आता जिल्हास्तरावर देण्यात आला आहे. या पुरवठादाराने जानेवारी 2022चे रेशन जिल्हाभरात वितरीतच केले नाही. त्यामुळे करोडो रुपयांचे लाखो किलो धान्य गेले कुठे? हा प्रश्न ऊपस्थित झाला आहे.वेळेत ऊचल न झाल्याने तो कोटा लॅप्स झाला असे सांगण्यात येते.

जानेवारीत गोरगरीबांना अन्नाचा दाना मिळाला नाही याला जबाबदार कोण? आजही या महीण्याचे धान्य पुढच्या महीण्यात वितरीत होत आहेत.या सर्व प्रकाराची जिल्हाधिकारी स्तरावर चौकशी व्हावी, अशी मागणी केली जात आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com