पुढच्या पिढीला अभिमान वाटणार्‍या चित्रपटांची निर्मिती-डॉ.सलील कुलकर्णी

एकदा काय झालं.. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी गप्पा आणि गाण्याच्या माध्यामातून प्रेक्षकांशी संवाद
पुढच्या पिढीला अभिमान वाटणार्‍या चित्रपटांची निर्मिती-डॉ.सलील कुलकर्णी

चाळीसगाव chalsigaon प्रतिनिधी

ते वेचले तेच ठेव..म्हणजे आपल्या पुढच्या पिढीला अभिमान वाटेल अशा गोष्टी चित्रपटाच्या माध्यामातून दाखल्या पाहिजे. आणि तेच मी एकदा काय झालं..! या (movie) चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला. मुलांशी संवाद साधण्याची एक पद्धत असते. संवाद हा पालक आणि मुलांमध्ये समांतर व्हावा अशी अपेक्षा आहे. आमच्या चित्रपटातून आम्ही तेच दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे चाळीसगाव (chalisgaon) येथील बाल कलाकार (Child actor) अर्जुन पुर्णपात्रे यांची मुख्य भूमिका असलेला चित्रपट सर्वांनी पाहवा असे आवाहन दिग्दर्शक डॉ.सलील कुलकर्णी (Director Dr.Salil Kulkarni) यांनी केले.

चाळीसगाव येथील राजपूत मंगल कार्यालयात बालकलाकार अर्जुन पुर्णपात्रे मुख्य भूमीकेत असलेला चित्रपट एकदा काय झालं च्या प्रमोशनसाठी दि,१६ रोजी गंमत गोष्टी, गप्पा आणि गाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून चित्रपटाचेे दिग्दर्शक, गायक डॉ.सलील कुलकर्णी उपस्थित होते. तर व्यासपीठावर डॉ. सत्यजीत पूर्णपात्रे, डॉ.शुभांगी पूर्णपात्रे, डॉ. मुकंद करंबळेकर उपस्थित होते.

दि ५ ऑगस्ट रोजी सर्वत्र प्रदर्शित होत असलेला एकदा काय झालं...! या चित्रपटा विषयी सांगतांना चित्रपट तयार करण्याचा मागचा उद्देश डॉ. कुलकर्णी यांनी उपस्थितांना सांगीतला. तसेच आजच्या पिढीपुढे सकारात्मक गोष्टी मांडण्यासाठी असे चित्रपट बनविणे गरजेचे असल्याचे सांगत. चित्रपटातील गंमती, जमती व गाणी गावून चित्रपटाचेे महत्व सांगीतले. याप्रसंगी डॉ.सत्यजीत पूर्णपात्रे व डॉ. शुभांगी पूर्णपात्रे यांनी देखील मुलाच्या चित्रपटाविषयी तळमळ व एक ग्रामीण भागातील मुलगा कसा मोठ्या पडद्यापर्यंत पोहचला यांचा प्रवास थोडक्यात सांगीतला. डॉ.मुकंद करंबळेकर यांनी डॉ.सलील कुलकर्णी यांच्याशी प्रभावी संवाद साधत प्रक्षेकांची मने जिकंली. याप्रसंगी मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com