Makeup Part 5 : असा करा कियारा, कतरीना व आलिया सारखा नैसर्गिक मेकअप

 BRIDAL natural  MAKEUP TREND
BRIDAL natural MAKEUP TREND

अलीकडच्या काळात झालेल्या सिनेस्टार आलिया भट, कतरीना कैफ, कियारा अडवाणी या सगळ्यांचे लग्नाच्या पोशाखासह त्यांनी केलेल्या मेकअपचा नवा ट्रेंड सुरू आहे. चेहर्‍यावर भरमसाठ मेकअप नकोसा वाटतो. डार्क मेकअप करण्याची इच्छापण कमी झाली आहे. आता मेकअपला ही नैसर्गिक पोत हवा आहे. तो कसा करावा, त्यासाठी कोणती सौंदर्य प्रसाधने वापरावीत याबाबतच्या या काही टिप्स.. आपणासाठी दिल्या आहेत जळगावच्या वैष्णवी ब्राइडल स्टुडिओ अ‍ॅण्ड ब्युटी सलुनने.. काय आहेत त्या टिप्स वाचा आणि अवलंब करा...

BRIDAL MAKEUP TREND (natural nude makeup)

आजच्या फॅशनच्या युगात रोजच नवनवी फॅशन येत आहे. यातही जे सेलिब्रिटी आहेत त्यांच्या फॅशन तर तासा तासाला बदलत असतात. सेलिब्रिटी ज्या काही नवीन फॅशन करतात तेव्हा ते बदल अधिक ठळकपणे दिसतात आणि त्या फॅशनचा नवा ट्रेंड म्हणून तरुण पिढी त्याचा सहजतेने स्विकार करते.

अलीकडच्या काळात झालेल्या सिनेस्टार आलिया भट, कतरीना कैफ, कियारा अडवाणी या सगळ्यांचे लग्नाच्या पोशाखासह त्यांनी केलेल्या मेकअपचा नवा ट्रेंड सुरू आहे. चेहर्‍यावर भरमसाठ मेकअप नकोसा वाटतो. डार्क मेकअप करण्याची इच्छापण कमी झाली आहे. आता मेकअपला ही नैसर्गिक पोत हवा आहे. असे आता आमच्याकडे येणार्‍या क्लाइंट तरुणींना वाटते.

आपण जसे आहोत तसेच लग्नात दिसावं हेच अनेकांना जास्त महत्त्वाचं वाटतं. त्यामुळे आज आलिया भट व कियाराच्या लग्नात जो ट्रेंड दिसला तो लवकरच आपल्या अवतीभवतीच्या लग्नातही दिसू लागेल. हा ट्रेंड आता अनेक वर्षे टिकेल कारण नॅचरल आणि सटल हा या काळाचा नवा चेहरा आहे.

नेहा चौधरी
नेहा चौधरी

असा करा ब्रायडल नॅचरल न्यूड मेकअप

ब्रायडल नॅचरल न्यूड मेकअप करण्यासाठी तुमची त्वचा स्वच्छ आणि हायड्रेटेड करून तयार करावी लागेल. क्लिझंरने चेहरा क्लीन करून घ्या लग्नातील मेकअप हा नेहमी जास्त वेळ टिकण्यासाठी विविध प्रकारचे प्रॉडक्ट्सचा वापर केला जातो. अशा प्रकारच्या मेकअप मुळे त्वचेला अधिक काळजी आणि पोषणाची गरज असते म्हणून चांगले मॉइश्चरायझर वापरा. त्यामुळे तुमच्या चेहर्‍याच्या त्वचेचे नुकसान होणार नाही .

तुम्ही न्यूड मेकअप साठी फ्लालेस फाउंडेशन ( flawless Foundation) ) वापरा या फाउंडेशन मुळे त्वचेचा टोन समसमान करते त्वचेचा टोन एक / दोन हलक्या रंगाचा भाग उजळ करण्यासाठी आणि डाग लपवण्यासाठी वापरले जाते.

सेटिंग पावडर सेट केल्याने तुमचा मेकअप जास्त काळ ठेवण्यास मदत होते. काउंटरिंग तुमच्या चेहर्‍याला आकार देण्यास मदत करते. ज्यामुळे( नाक, हनवटी, गालाची हाडे )लहान /अधिक परिभाषित दिसतात.

हायलाईट करणे

तुमच्या चेहर्‍यावरील उच्च बिंदूवर जोर देण्यास आणि विशिष्टांकडे अधिक प्रकाश आकर्षित करण्यास मदत करते. आय मेकअप साठी पोशाखा नुसार तुम्ही गोल्डन ,ब्राऊन अथवा कॉपर कलरची आयशॅडो वापरू शकता. ज्यामुळे डोळ्यांचे सौंदर्य अधिक खुलून दिसेल . गालांवर ब्लश हलक्या रंगाचे लावून अधिक दोलाईमान बनवा ग्रेडीएंट गोल्ड रंगाचे वापरू शकता. न्यूड (हलक्या रंगाचे)लिपस्टिक शेड निवडा तुमच्या पेहरावच्या रंगसंगतीला मॅच होत आहे याची काळजी नक्की घ्या आणि मेकअप पूर्ण करा.

ब्रायडल हेअर स्टाईल
ब्रायडल हेअर स्टाईल

ब्रायडल हेअर स्टाईल

Traditional floral Updo bun

क्लासिक वधूच्या परंपरा स्वीकारून लाल गुलाबी फुलांनी सजवलेले स्लीक खेचलेल्या लो-राईज बन निवडू शकता. कारण न्यूड (हलक्या रंगाच्या )लेहंगाशी प्रतिध्वनीत होतो. टाईमलेस हेअर बन हा केवळ गडबड मुक्त पर्याय नाही. तर माने विदाई सह चेहर्‍याला सममिती देखील मिळते. वधूच्या सौंदर्यावर आणि आता ट्रेंडीग असणार्‍या फॅशनवर लक्ष ठेवून आम्ही काम करत आहोत. ज्यामुळे नववधुना हलका मेकअक करून चेहर्‍याला नैसर्गिक पोत येण्यास मदत होईल.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com