युवती असो वा नोकरदार महिला घराबाहेर पडतांना चेहरा चांगला दिसावा असा प्रत्येकीचा प्रयत्न असतो. त्यासाठी मेकअप करणे गरजेचे असते. परंतू प्रत्येकवेळी ब्युटी पार्लरमध्ये जाणे वेळेअभावी शक्य नसते. अशा वेळी डेली युज साठीचा सेल्फ मेकअप करणे क्रमप्राप्त होतो. तो कसा करावा, त्यासाठी कोणती सौंदर्य प्रसाधने वापरावीत याबाबतच्या या काही टिप्स.. आपणासाठी दिल्या आहेत जळगावच्या वैष्णवी ब्राइडल स्टुडिओ अॅण्ड ब्युटी सलुनने.. काय आहेत त्या टिप्स वाचा आणि अवलंब करा...
सेल्फ मेकअप करतांना या काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही घरच्या घरी मेकअप करू शकता. मेकअप कसा करावा, याची सोपी पध्दत आपण जाणून घेणार आहोत. योग्य पध्दत अवलंबविल्यास चेहर्यावरील मेकअप दीर्घकाळासाठी टिकून राहण्यास मदत होईल. त्या टिप्स अशा...
1) Nirmal Expoliating lotion
संपूर्ण चेहर्यावर नीट लावा आणि हलक्या हाताने चेहर्याचा मसाज करावा. त्यानंतर चेहरा स्वच्छ करा. त्वचेच्या प्रकारानुसार बाजारात उपलब्ध असलेले टोनर wet wipes वर घेवून चेहर्यावर लावा.
2) मॉश्चराईझिंग Moisturising
चेहर्याला चांगले Moisturiser लावा ज्यामुळे तुमची त्वचा मऊ आणि मुलायम त्वचा हायड्रेशन छान होणार.
3) प्राईमर Primer
photo fInish सारखा प्रायमर तुम्ही वापरू शकता. त्वचा खडबडीत न राहता ती एक सारखी दिसल्यामुळे त्यावचर केलेला मेकअप हा अधिक खुलून दिसतो.
4) कन्सिलर Concealers
चेहर्यावरील डाग, पिंगमेंटेशन, टॅनींग लपविण्यासाठी Concealer वापरा
5) Hydrating Spray
त्वचेची आद्रता कायम ठेवण्यासाठी Spray वापरा.
6) Foundation
फाउडेशन निवडतांना ते चांगल्या दर्जाचं असेल अस पाहूनच निवडा.
7) Translucent powder
ट्रान्सलुसेंट पावडर लावावी. जेणेकरुन तुमचा मेकअप दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी तुमचा मेकअप सेट करण्यात मदत होईल
8) कॉम्पॅक्ट पावडर लावणे, ज्यामुळे इन्स्टंट ब्राईट टोन मिळतो. मेकअप लॉंग लास्टिंग टिकून राहतो.
9) ब्रशवर थोडसं ब्लश घेऊन गालावंर लावा. त्यानंतर हायलायटर लावा. चेहरा चमकदार दिसतो. त्यानंतर मस्करा,आयब्रो शेपिंग, काजळ, आयशॅडो मॅचिंग, वेशभूषेनुसार लावणे. त्यानंतर आयलायनर लावणे. लिपस्टिक लावायच्या अगोदर ओठायला एक्सफोलिएट करा. मॉइश्चरायझर लावून त्यावर लिपस्टिक लावणे.
10) संपूर्ण मेकअप झाल्यानंतर सेटींग स्प्रे करा. अशा पध्दतीने घरच्या घरी मेकअप करू शकता.